‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ लवकरच भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं की, डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारीत “आम्ही जरांगे” हा सिनेमा लवकरच म्हणजेच १४ जून, २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी अंगावर शहारे आणणारा याच चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झालाय. अधिक वाचा – …
‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ लवकरच भेटीला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं की, डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारीत “आम्ही जरांगे” हा सिनेमा लवकरच म्हणजेच १४ जून, २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी अंगावर शहारे आणणारा याच चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झालाय.
अधिक वाचा –

बिग बॉस OTT 3 प्रोमो आऊट! दमदार ड्रामामध्ये होस्ट करणार अनिल कपूर

या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारताय. तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका साकारली आहे. इतकच नव्हे तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारताय. सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही महत्वाची भूमिका साकारत आहेत.
अधिक वाचा –

समीरा रेड्डीला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा दिला होता सल्ला; इतक्या वर्षांनी केला खुलासा

नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित या चित्रपटाचे सहनिर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. या जबरदस्त क्रांतिकारी चित्रपटाची कथा – पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे आणि किशोर गरड यांनी लिहिले असून या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह आहेत.
अधिक वाचा –

सोनाक्षी सिन्हाचं शुभमंगल सावधान! तारीख ठरली; जहीर इकबालसोबत सात फेरे

 

View this post on Instagram

 
A post shared by Zee Music Marathi (@zeemusicmarathi)