सहा दिग्गज अभिनेत्रींसोबत स्वप्निल जोशीची धमाल, ‘बाई गं’ लवकरचं

सहा दिग्गज अभिनेत्रींसोबत स्वप्निल जोशीची धमाल, ‘बाई गं’ लवकरचं

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत एक नवी कोरा, धमाल असलेला ‘बाई गं’ हा नवा चित्रपट येत्या १२ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती डॉ .आशिष अग्रवाल, नितीन प्रकाश वैद्य सोबत ओ एम जी मीडिया व्हेंचर्स यांनी केली आहे.
अधिक वाचा –

‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ लवकरच भेटीला

आतापर्यंत कायम लव्हस्टोरी मध्ये लव्ह ट्रँगल होताना दिसायचा. पण आता हे चित्र थोडे बदलणार आहे. एक अभिनेता आणि सोबत तब्बल ६ नायिका ही संकल्पनाच या सिनेमाची उत्सुकता वाढविणारी आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, यात हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे.

बिग बॉस OTT 3 प्रोमो आऊट! दमदार ड्रामामध्ये होस्ट करणार अनिल कपूर

दमदार कलाकारांची टीम ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू ठरणार आहे. यामध्ये स्वप्नील जोशी मुख्य अभिनेता असून यामध्ये तो वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे , अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान अशा अफलातून अभिनेत्री ‘बाई गं’ चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. सोबतच सागर कारंडे देखील विशेष भूमिकेत असणार आहे.
अधिक वाचा –

समीरा रेड्डीला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा दिला होता सल्ला; इतक्या वर्षांनी केला खुलासा

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. तगाणी जय अत्रे, मंदार चोळकर आणि समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वरुण लिखते यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by स्वप्नील जोशी (@swwapnil_joshi)