पूर्वांचल एक्सप्रेस-वे वर भाविकांच्या बसची उभ्‍या ट्रकला धडक; ४ ठार

पूर्वांचल एक्सप्रेस-वे वर भाविकांच्या बसची उभ्‍या ट्रकला धडक; ४ ठार

Bharat Live News Media ऑनलाईन ; उत्‍तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्‍ह्यात पूर्वांचल द्रुतगती मार्गावर आज (सोमवार) भीषण अपघात घडल्‍याचे समोर आले आहे. पूर्वांचल एक्‍स्‍प्रेस-वे वर थांबलेल्‍या हाइवा (ट्रक) ला बसने जोरदार धडक दिली. यामध्ये चार लोकांचा मृत्‍यू झाला आहे. तर जवळपास २५ लोक जखमी झाले आहेत. जखमी लोकांना उपचारासाठी मऊ आणि गाजीपूर येथील जिल्‍हा रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर घटनास्‍थळी मोठा गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत स्‍थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्‍त वाहने बाजुला घेतली आणि वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी जखमींना तात्‍काळ रूग्‍णालयात भरती केले.
अयोध्येत बसमध्ये वेगवेगळ्या परिसरातील २५ लोक बसले. जे अयोध्याहून दर्शनानंतर आपापल्‍या घरी परतत होते. ही बस विक्रमगंज जात होती. मुस्‍सेपूर गावाजवळ पूर्वांचल एक्‍स्‍प्रेस वे वर एक ट्रक थांबला होता. या ट्रकला भरधाव आलेली बस पाठीमागून येत धडकली. बस चालकाला डुलकी लागल्‍यामुळे हा अपघात घडल्‍याचे बोलले जात आहे. दरम्‍यान पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.
हेही वाचा : 

लग्नानंतर पाचव्या दिवशी दागिन्यांसह दोन नववधू पसार 
Amravati News : खासदार बळवंत वानखडे यांचे पोस्टर फाडले; अमरावतीत तणाव  
जपानचा ‘हा’ ‘सुपरफूड’ पदार्थ; ज्‍यामुळे तारुण्य, दीर्घायुष्यासाठी लाभदायक