‘एनडीए’ सरकारला शेअर बाजाराचा ‘सॅल्यूट’! सेन्सेक्स-निफ्टीची उच्‍चांकी झेप

‘एनडीए’ सरकारला शेअर बाजाराचा ‘सॅल्यूट’! सेन्सेक्स-निफ्टीची उच्‍चांकी झेप

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : भाजपप्रणित एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला.  केंद्रातील स्‍थिर आणि भक्‍कम सरकार स्‍थापनेचे सकारात्‍मक परिणाम आज (दि.१० जून) शेअर बाजारावर व्‍यवहार सुरु होतानाच दिसले. तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही विक्रमी उच्चांकावर उघडले. बँक निफ्टी देखील जीवन उच्च पातळीवर खुला आहे.
आज शेअर बाजार सुरु हाेताच काय घडलं?

स्‍थिर आणि भक्‍कम सरकार स्‍थापनेचे शेअर बाजारावर सकारात्‍मक परिणाम
सेन्सेक्स आणि निफ्टीची नव्या उच्चांकावर व्‍यवहारास सुरुवात
निफ्टी 23,400 च्या नवीन स्तरावर
सेन्सेक्सने नवीन विक्रमी पातळी गाठली, प्रथमच 77,000 चा टप्पा पार केला
बँक निफ्टीने प्रथमच 50,150 चा टप्पा पार केला

आज शेअर बाजार नव्या उच्चांकावर उघडला. निफ्टीने 23,400 ची नवीन पातळी गाठली तर सेन्सेक्सने प्रथमच 77,000 चा टप्पा ओलांडला. बँक निफ्टीने प्रथमच 50,150 चा टप्पा पार केला आहे. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स सुमारे 327 अंकांच्या वाढीसह 77,000 च्या वर व्यवहार करत होता. निफ्टीही 100 अंकांच्या वाढीसह 23,390 च्या आसपास फिरत होता. बँक निफ्टी 300 अंकांच्या वाढीसह 50,111 च्या आसपास व्यवहार करत होता.
शेअर बाजारात तेजी कायम
शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्सने 76,795 चा नवा विक्रम केला होता. सेन्सेक्स 1618 अंकांनी वाढून 76,693 वर बंद झाला. निफ्टी 468 अंकांनी वाढून 23,290 वर बंद झाला आणि निफ्टी 511 अंकांनी वाढून 49,803 वर बंद झाला होता.

Market salutes Modi’s third term: Sensex-Nifty open at all-time high
Read @ANI Story | https://t.co/WE6ZjvlxBy#Sensex #Nifty #BSE #NSE #IndiaStockMarket #ModiGovernment pic.twitter.com/iz9zJnYtB4
— ANI Digital (@ani_digital) June 10, 2024

बाजाराच्या सुरुवातीला १५५८  शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर १८९ शेअर्संनी घसरण अनुभवली. स्मॉलकॅप्स निर्देशांकात सुमारे 1 टक्क्यांची वाढ दिसून आली. निफ्टी बँकेत सुमारे 280 अंकांची वाढ दिसून आली. मात्र, आयटी क्षेत्रातील शेअर्समध्‍ये सुरुवातीच्‍या व्‍यवहारात घसरण झाली.