आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : आर्थिक बाबींशी संबंधित अनेक कामे होतील
आज आर्थिक बाबींशी संबंधित अनेक कामे होतील, असे श्रीगणेश सांगतात. घरातील ज्‍येष्‍ठाचे आशीर्वाद लाभतील. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. तुमच्‍या संशयास्पद स्वभाव तुमच्यासाठी आणि इतरांसाठी त्रासदायक ठरु शकतो. आत्मपरीक्षण करून दोष सुधारणे फायदेशीर ठरेल. तुमचे महत्त्वाच्‍या कामाची चर्चा करु नका. अन्यथा या चुकीचा फायदा कोणीतरी घेऊ शकतो.
वृषभ : प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होतील
श्रीगणेश म्‍हणतात की, उत्पन्न स्त्रोत खंडीत झाल्‍याने निर्माण झालेल्‍या आर्थिक समस्या सुटतील. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक पाठबळ खूप महत्वपूर्ण ठरेल. मुलांच्‍या संगतीकडे दुर्लक्ष करु नका. तुम्‍ही तुमच्‍या कार्यपद्धतींमध्ये काही बदल केल्‍यास प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होतील.
मिथुन : समजूतदारपणाने परिस्‍थितीवर मात कराल
प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे. समजूतदारपणाने परिस्‍थितीवर मात कराल. शिक्षणाशी संबंधित अडथळा दूर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. पालकांच्या समस्यांबद्दल तणाव असू शकतो. मित्र, नातेवाईक यांच्याशी वाद टाळा. तुमचा संशयी स्वभाव बदलण्‍याचा प्रयत्‍न करा. लवचिकतेने शांतपणे परिस्थितींवर चर्चा करा, अशी सूचना श्रीगणेश करतात.
कर्क : कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील
जमीन खरेदीची योजना असेल तर तत्‍काळ निर्णय घ्‍या. अशा प्रकारची गुंतवणूक तुमच्यासाठी महत्त्‍वपूर्ण ठरेल, असे श्रीगणेश सांगतात. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत मनोबल खचू देऊ नये. विद्यार्थी त्यांच्या करिअरबाबत अत्यंत सतर्क राहतील. घाऊक व्यापारात अधिक व्यवहार होतील. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. घरातील वातावरणात मुलांची सहकार्याची वृत्ती अनुकूल राहील. स्‍वत:च्‍या विश्रांतीकडे दुर्लक्ष करु नका.
सिंह: आर्थिक गुंतवणूक बाबींमध्ये काळजीपूर्वक निर्णय घ्या
आज तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रीत करण्‍याची सर्वोत्तम वेळ आहे. मुलांच्‍या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. धार्मिक कार्यक्रमांशी संबंधित कार्यक्रम होतील. अहंकारवर नियंत्रण ठेवा. जवळच्या नातेवाईकाशी वैयक्तिक बाबींवरून मतभेद होऊ शकतात. आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्या. या काळात व्यवसायात काही अडथळे येतील, असे श्रीगणेश सांगतात
कन्या : भावी ध्येयासाठी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल
श्रीगणेश म्‍हणतात की, आज कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. तुमच्‍याविषयीचा आदर वाढेल. काही काळासाठी, तुमच्या भावी ध्येयासाठी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. काही वैयक्तिक कारणांमुळे दिवसाच्या सुरुवातीला थोडी तणावपूर्ण परिस्थिती राहिल. मात्र दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये घाई करू नका.
तूळ : तुमच्या कल्पना अंमलात आणण्यासाठी हीच योग्य वेळ
श्रीगणेश सांगतात की, घराची देखभाल आणि बदलाशी संबंधित कामे आज होतील. तुमच्या कल्पना आणि योजना अंमलात आणण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. जवळच्या नातेवाईकाशी सुरू असलेले मतभेद समजुतीने सोडवले जातील. अतिरिक्त खर्चामुळेही चिंता राहिल. संयमाने परिस्‍थिती हाताळा. व्यवसायात काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून सुटका मिळेल.
वृश्चिक: व्यवसायात सुधारणा होईल.
श्रीगणेश म्‍हणतात की, आज खर्चाचे प्रमाण अधिक असेल तरी हे खर्च मोठ्या कारणासाठी असतील. तुमच्या कार्यक्षमतेमुळे अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रवास टाळा. आळशीपणा किंवा अति विचार करणे वेळेचा अपव्यय होऊ शकतो. व्यवसायात सुधारणा होईल.
धनु : तुम्हाला आत्मविश्वास आणि उत्साह जाणवेल
श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहस्थिती अनुकूल राहील; तुम्हाला आत्मविश्वास आणि उत्साह जाणवेल. घरातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीची चिंता जाणवेल. व्यावसायिक कामात काही निष्काळजीपणा किंवा चुकीचे परिणाम भोगावे लागण्‍याची शक्‍यता.
मकर : व्यावसायिक कामे सुरळीत सुरु राहतील
कौटुंबिक आणि समाजाशी संबंधित कार्यात तुमचे पूर्ण योगदान राहील, असे श्रीगणेश सांगतात. प्रशंसनीय कामामुळे घर आणि समाजात तुमच्या कर्तृत्वाची प्रशंसा होईल. आर्थिक कामात हिशेब करताना काही प्रकारची चूक होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्‍या. जवळच्या नातेवाईकासोबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील. व्यावसायिक कामे सुरळीत सुरु राहतील.
कुंभ: विद्यार्थी शिक्षणावर लक्ष केंद्रित करतील
आज भूतकाळातील चुकांवर चिंतन करुन त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. याचे सकारात्‍मक परिणाम होईल. विद्यार्थी शिक्षणावर लक्ष केंद्रित करतील. आपल्‍या भावनांवर नियंत्रण ठेवा; अन्यथा काही नकारात्मक विचार तुम्हाला त्रास देऊ शकतात, असे श्रीगणेश सांगतात. आई-वडील आणि वरिष्ठांशी होणार्‍या मतभेदाकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायाशी संबंधित काही उत्कृष्ट माहिती मिळू शकते.
मीन: कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका
आज काही विशेष कामे होतील. विशेष व्यक्तीशी लाभदायक संपर्क होईल, असे श्रीगणेश सांगतात. दैनंदिन दिनचर्येत बदल घडवून आणण्याचा इच्छेला यश मिळेल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जवळची व्यक्ती ईर्षेच्या भावनेने तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू शकते. व्यवसायात नवीन कामे सुरू करण्यापूर्वी सुरु असणार्‍या कामांकडे लक्ष द्या.