रामदास आठवलेंचा मंत्रीमंडळात समावेश, गंगाखेडमध्ये जल्लोष

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा समावेश झाल्याबद्दल शहरात रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी समाजबांधवांच्या वतीने रविवारी (दि.९) संध्याकाळी ८ वाजता भव्य आतिषबाजी करण्यात आली. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी समाजबांधवांच्या वतीने मंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिमंडळातील समावेश याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे …

रामदास आठवलेंचा मंत्रीमंडळात समावेश, गंगाखेडमध्ये जल्लोष

गंगाखेड; Bharat Live News Media वृत्तसेवा : रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा समावेश झाल्याबद्दल शहरात रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी समाजबांधवांच्या वतीने रविवारी (दि.९) संध्याकाळी ८ वाजता भव्य आतिषबाजी करण्यात आली.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी समाजबांधवांच्या वतीने मंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिमंडळातील समावेश याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भालेराव यांच्या नेतृत्वाखाली फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
यावेळी नगरसेवक रनधीरराजे भालेराव, रिपब्लिकन पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष अशोक घोबाळे, मोतीराम कोरके, राहुल गायकवाड, ॲड.भूषण साळवे, ॲड.विजय साळवे, नवनाथ साळवे, प्रवीण साळवे, जालींदर साबळे, बबलू आचार्य, सिध्दार्थ कांबळे आदींसह रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते..