कुरुंदवाड : नरेंद्र मोदींच्या शपथविधींनंतर आनंदोत्सव

कुरुंदवाड : नरेंद्र मोदींच्या शपथविधींनंतर आनंदोत्सव

कुरुंदवाड; Bharat Live News Media वृत्तसेवा : नरेंद्र मोदी यांनी आज (दि.9) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. याबद्दल कुरुंदवाड शहर भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. कुरुंदवाड येथील मारुती चौकात यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. साखर-पेढे व लाडू वाटण्यात आले.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळून निर्विवादपणे त्यांची सत्ता आली. सर्वसामान्य जनतेला या क्षणाची उत्सुकता होती. याचा कुरुंदवाड येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मारुती चौकात भाजप व मित्र पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी विजयाच्या घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी करण्यात केली. यावेळी कार्यतर्त्यांनी साखर-पेढे व लाडू वाटले.
यावेळी प्रा. चंद्रकांत मोरे, उदय डांगे, सोमेश गवळी, उमेश कर्नाळे, संजय डोंगरे, स्वप्नील श्रीधनकर, रमेश खराडे, महेश निकम, आयुब पठाण, अशोक सुतार, दिनेश पटेल, शुभम जोग, आण्णाप्पा मगदूम, करण राजमाने, कृष्णा नरके, दीपक परीट, रघु नाईक, संजय तोडकर आदी यावेळी उपस्थित होते.