कोल्हापूर : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान, चाहत्यांचा साखर-पेढे वाटून जल्लोष

कोल्हापूर : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान, चाहत्यांचा साखर-पेढे वाटून जल्लोष

अब्दुल लाट; Bharat Live News Media वृत्तसेवा : अब्दुल लाट (ता.शिरोळ) येथे भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने ठिकठिकाणी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथविधी घेतल्यानंतर साखर-पेढे वाटप करत तसेच आतिषबाजी करून जल्लोष केला.
लोकसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळविल्यानंतर आज (दि.9) देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदींनी दिल्लीत तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर शहरात भारतीय जनता पक्षासह मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर यावेळी आतिषबाजी करत साखर व पेढे वाटप केले. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून जल्लोष केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे,यड्रावकर गटाचे कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य विद्याधर कुलकर्णी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्या व भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा वर्षा पाटील, तालुका उपाध्यक्ष रमेश चव्हाण,हृषीकेश आवळे,विनायक पाटील, वर्धमान ठगरे,सचिन दांडेकर,शरद पाटील,उपसरपंच ज्ञानेश्वर नावरे,ग्रा.पं. सदस्य संदीप बोदगे,शरद कुमटोळे,नंदकुमार कदम,भाऊसो कदम आदींसह भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.