नांदेड: बेट सांगवी येथे विहिरीत पोहताना शॉक लागून दोघांचा मृत्यू
लोहा; Bharat Live News Media वृत्तसेवा: बेट सांगवी (ता, लोहा) येथे दोन तरुण सकाळी अकराच्या दरम्यान विहिरीत पोहण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीमध्येच शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही मुलांचा अंत्यसंस्कार बेट सांगवी येथे करण्यात आला.
संतोष सखाराम वानखेडे (वय १९, रा. मधली सांगवी), राजेश गणेश वानखेडे (वय १७, रा. कपिलेश्वर सांगवी) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेट सांगवी येथे आज सकाळी अकराच्या दरम्यान दोन तरुण विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. संतोष आणि गणेश पोहत असताना विहिरीत मोटारीचा विद्युत प्रवाह उतरला होता. त्याचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला. विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून बेट सांगवी येथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे बेट सांगवीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
नांदेड : चॉकलेटचे अमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार; नराधमास अटक
नांदेड : बिलोली तालुक्यात जोरदार पाऊस; वीज पडून बैलाचा मृत्यू
नांदेड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास २५ वर्षे सश्रम कारावास