महाड औद्योगिक वसाहतीतील प्रिव्ही कंपनीला भीषण आग

महाड औद्योगिक वसाहतीतील प्रिव्ही कंपनीला भीषण आग

महाड; Bharat Live News Media वृत्तसेवा : महाड औद्योगिक वसाहतीमध्ये आगीचे सत्र सुरूच असून आज सकाळी ६.१५ च्या सुमारास प्रिव्ही कंपनीच्या युनिट दोन मधील दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना समोर आली आहे.
आग लागल्याचे समजताच कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेसह महाड औद्योगिक वसाहत फायर स्टेशनने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. नोव्हेंबर महिन्यापासून महाड औद्योगिक वसाहतीमध्ये आतापर्यंत ४ आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, महाड औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा : 

नऊ महिन्यांनंतरही इर्शाळवाडीतील ४३ कुटुंबे पक्क्या घरापासून वंचित
मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक वळवली