म्हशी घेऊन जाणाऱ्या २ ट्रक चालकांना ठेचून मारले; गौरक्षकांचे कृत्य  

म्हशी घेऊन जाणाऱ्या २ ट्रक चालकांना ठेचून मारले; गौरक्षकांचे कृत्य  

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छत्तीसगढमध्ये म्हशींची वाहतूक करणाऱ्या तिघांना गायींची तस्करी करत असल्याच्या संशयावरुन  मारहाण करण्यात आली. यात दोघांचा मृत्यू झाला असुन एकजण गंभीर जखमी आहे. तिघेही उत्तरप्रदेशमधील आहेत.  ही घटना शुक्रवारी (दि.८) पहाटे अरांग मंदिराजवळ घडली. जखमी व्यक्तीचा ५७ सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दोघे ठार, एक गंभीर जखमी
माहितीनुसार, शुक्रवारी १५-२० लोकांना ट्रकमधुन गायींची तस्करी होत असल्याचा संशय आला. त्यानंतर या लोकांनी  रायपूरपासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या महासमुंद-आरंग रोडवरील पटेवा येथून  ट्रकचा पाठलाग केला. त्यांनी महानदीवरील पुलावर ट्रक अडवला आणि हल्ला केला. हा हल्ला पहाटे ३ च्या दरम्यान झाला असुन  दोघे ठार झाले आहेत. तर एक गंभीर जखमी झाला आहे. तिघेही उत्तरप्रदेशमधील सहारनपूर शहरातील रहीवासी आहेत.  रायपूरचे एएसपी कीर्तन राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एका व्यक्तीचा मृतदेह घटनास्थळी सापडला . दोन जखमी पुरुषांना सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे दोघापैकी एकाचा मृत्यू झाला.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
घटनेतील जखमी व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होवू लागला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तो व्यक्ती म्हणतं आहे की,  “१४-१५ लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यापैकी दोघांना मारहाण केली आणि त्यांचे मृतदेह पुलावरून नदीच्या पात्रावर फेकून दिले. जीव वाचवण्यासाठी त्याने पुलावरून उडी मारल्यामुळे वाचल्याचे सांगितले.
हेही वाचा 

Jalgaon Crime News | आधी लग्नाचे आमिष, नंतर बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार
Lok Sabha election result : राजकारणाच्‍या ‘नादा’नं बाेट गमावलं! भाजप समर्थकाने मंदिरात ताेडले स्‍वत:चे बोट!
गडचिरोली : ६ कोटींचा धानखरेदी गैरव्यवहार प्रकरण; आणखी एका कर्मचाऱ्यास अटक