सीरियात भीषण अपघात; शाळकरी मुलांनी भरलेली बस नदीत कोसळली

सीरियात भीषण अपघात; शाळकरी मुलांनी भरलेली बस नदीत कोसळली

Bharat Live News Media ऑनलाईन ; उत्‍तर-पश्चिमी सीरिया मध्ये गुरूवारी एक भीषण अपघात झाल्‍याचे समोर आले आहे. एक स्‍कूल बस नदीत कोसळली. या दुर्घटणेत जवळपास सात लोकांचा मृत्‍यू झाला आहे. तर २० लोक जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये मुलांचा समावेश आहे. स्‍थानिक नागरिकांच्या मते हा अपघात इदलिब शहराच्या पश्चिमेकडील दार्कुश जवळ घडली आहे. स्‍कूल बस ओरोंटेस नदीत कोसळली.
घटनास्‍थळी पोहोचले बचाव पथक
स्‍थानिकांच्या मते घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्‍थळी धाव घेतली. बचाव पथकाच्या सहा तासांची शोध मोहिम चालवली. बस नदीमध्ये कशी कोसळण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दार्कुश येथील एका रूग्‍णालयात डॉक्‍टरांच्या माहितीनुसार बसमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि अनाथ मुलांच्या शाळेतील विद्यार्थी होते.
हेही वाचा : 

Sunita Williams : अंतराळात पोहोचल्‍यावर सुनीता विल्‍यम्‍स यांनी आनंदाने मारल्‍या उड्या; सहकाऱ्यांची घेतली गळाभेट

BBA, BCA अभ्यासक्रमांच्या नावांमध्ये बदल

उत्तर प्रदेशात भाजपचे रणनीतीत चुकले कुठे?