नोकर कपातीचे संकट कायम; गुगल, मायक्रोसॉफ्टचा १ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

नोकर कपातीचे संकट कायम; गुगल, मायक्रोसॉफ्टचा १ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यातून नोकरकपातीचे सत्र थांबताना दिसत नाही. आत गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या विभागातील जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगलने त्याच्या क्लाऊड डिव्हिजनमधील १०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्टने एक हजार कर्मचाऱ्यांचे राजीनामे (Tech layoffs 2024) घेतले आहेत.
CNBCने दिलेल्या माहिती नुसार गुगलने त्यांच्या गुगल क्लाऊड या विभागातून सेल्स आणि इंजिनिअरिंग या विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १०० असल्याचे सांगण्यात आले आहे. गुगलने २०२४मध्ये त्यांच्या जगभरातील विविध कार्यालयातून कर्मचारी कपात केलेली आहे. गुंतवणूक आणि व्यावसाय यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कामांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याची गुगलची भूमिका असल्याने ही कर्मचारी कपात (Tech layoffs 2024) केली जात आहे.
तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्टने मिक्स रिअॅलिटी विभागातून एक हजार कर्मचाऱ्यांची कपात केलेली आहे. होलो लेन्स २ या विभागातील कर्मचाऱ्यांचा यात (Tech layoffs 2024) समावेश आहे.
गुगलेच सीईओ सुंदर पिचाई यांनी यापूर्वी कर्मचाऱ्यांना एक इमेल पाठवला होता. यामध्ये २०२४च्या मध्यापर्यंत कर्मचारी कपातीवर नियंत्रण येईल असे म्हटले होते, पण प्रत्यक्षात तसे होतान दिसत नाही.

Go to Source