सत्ता स्थापनेबाबत राहुल गांधींचे मोठे विधान म्हणाले…

सत्ता स्थापनेबाबत राहुल गांधींचे मोठे विधान म्हणाले…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सत्ता स्थापनेबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेणार आहे. उद्या यासंदर्भात आम्ही मित्र पक्षांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूक आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी लढवली. आमची लढाई संविधान वाचविण्यासाठी होती.
देशातील मजूर, गरिब, शेतकरी, आदिवासींनी संविधान वाचविले आहे, त्यांचे मी आभार मानतो. यापुढे त्यांच्यासोबत काँग्रेस कायम राहील, अशी ग्वाही देत इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या समन्वयातून यश मिळाले आहे, असे ते म्हणाले.
आमची बँक खाती गोठवली, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले, मोदी- शहांनी अनेकांना धमकावले. लोकशाहीवर हल्ला करण्याचा भाजपने प्रयत्न केला. परंतु, काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी घटक पक्षांच्या नेत्यांचा आदर केला. आम्ही सर्वांनी एकसाथ लढत दिली, असे ते म्हणाले. वायनाड, रायबरेलीतील जनतेला मनापासून धन्यवाद देतो, असे ते म्हणाले.
 

Go to Source