लोकसभा निकालाच्या धामधुमीत उमेदवारांचे प्रतिनिधीच उपाशी

लोकसभा निकालाच्या धामधुमीत उमेदवारांचे प्रतिनिधीच उपाशी

नाशिक : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीच्या निकालाविषयी विविधठिकाणी धामधुम सुरु आहे. निकालाचा कौल कोणाच्या बाजूने असेल याकडे सर्वांचे लक्ष लागू आहे. उमेदवारांबरोबर मतदारांमध्ये देखील मंगळवारी (ता. ४) जाहीर होणाऱ्या निकालाविषयी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गुलाल उधळेल, रंगही चढेल मात्र या धामधुमीत कर्तव्य निभावणारे उमेदवारांचे प्रतिनिधी सुर्य डोक्यावर आला तरी उपाशी आहेत.
उमेदवारांच्या प्रतिनिधींना नाश्ताच नाही
नाशिक आणि दिंडोरीत उमेदवारांनी त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींसाठी नाष्ट्याची सुविधा केली. परंतु दुपारचे साडेअकरा वाजता मतमोजणी केंद्रात नाश्ताच पोहचला नाही. उमेदवारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच याबाबत तक्रार केली असता पोलिसांच्या गलथान कारभारामुळे प्रतिनिधी मतमोजणी सुरु झाली. त्यावेळी सकाळपासूनच उपाशी असल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला आहे. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सरते शेवटी दहा ते पंधरा मिनिटात नाश्ता पोहोच करण्याची हमी पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा:

Nanddurbar Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates | ॲड. पाडवी यांची ८3 हजारांची आघाडी
Lok Sabha Election Results 2024 Live| रावेर येथे सलग फेरीमध्ये रक्षा खडसेंनी घेतली आघाडी