मुलाचा मृतदेह लटकवला खुंटीला

मुलाचा मृतदेह लटकवला खुंटीला

झांसी, वृत्तसंस्था : मध्यप्रदेशातील झांसीमध्ये एकाने आपल्या चार वर्षांच्या निष्पाप मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह दोरीने खुंटीला लटकवला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर त्याने पत्नीचा गळा घोटून खून आणि स्वतः स्वयंपाकगृहात जाऊन गळफास घेऊन जीवन संपवले.
गेल्या काही दिवसांपासून घरात वाद सुरू असल्याने ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. ती व्यक्ती आपल्या पत्नीला नेहमी दारूच्या नशेत मारहाण करायची. तीन दिवसांपूर्वी महिला भाच्याच्या वाढदिवसानिमित्त मुलासह माहेरी गेली होती. त्यावेळी तिच्याशी पतीचे भांडण झाले आणि महिलेने त्याच्याशी नाते तोडले. त्यानंतर तो आपल्या मुलाला घेऊन घरी आला. एक दिवसांनी तो पुन्हा सासुरवाडीत आल्यानंतर त्या तरुणाने मुलाची आणि पत्नीची हत्या केली. ही घटना नैनागडच्या तलैया गल्लीत घडली. नीलेश साहू (वय 40) याचे प्रियांका (35) हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना 4 वर्षांचा हिमांशू नावाचा मुलगा होता.
नीलेश रिक्षा चालवत होता. नीलेश दारू पिऊन नेहमीच प्रियांकाला मारहाण करायचा. ‘आम्ही त्याला समजावून सांगत होतो पण त्याच्यात काहीच फरक पडत नव्हता’, असे प्रियांकाचा भाऊ मोनू याने सांगितले.
नाते तोडल्यानंतर नीलेश हा प्रियांकावर नाराज होता. यातून त्यांच्यात भांडणे झाली. पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर खोली बंद केली. ‘तिघांचे मृतदेह बघितल्याने मला खूपच धक्का बसला’, असे मोनू म्हणाला. या घटनेनंतर परिसरात खूपच खळबळ माजली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.