मे महिन्यात उष्माघाताने देशात ४६, राज्यात ११ जणांचा मृत्यू

मे महिन्यात उष्माघाताने देशात ४६, राज्यात ११ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : देशभरात मे महिन्यात उष्माघाताने ४६ तर महाराष्ट्रात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. उष्णघाताशी संबंधित आजार आणि मृत्यूची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली. या सरकारी आकडेवारीनुसार, उन्हाळ्याच्या ३ महिन्यांमध्ये उष्माघातामुळे देशात ५६ लोकांचा मृत्यू झाला.

उन्हाळ्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढला होता, मे महिन्यामध्ये तर उत्तर भारतासह देशभरात अति उष्णतेचा प्रभाव जाणवला. भारतीय हवामान खात्याच्या विभागानुसार यंदा मे महिन्यात सलग जास्त दिवस उष्णतेची लाट होती. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात आणि उष्णतेशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे.

सरकारच्या आकडेवारीनुसार, उष्माघाताने मध्य प्रदेशात सर्वाधिक १४ मृत्यूची नोंद झाली. तर महाराष्ट्र – ११, आंध्र प्रदेश – ६ आणि राजस्थान – ५ अशा मृत्यूच्या नोंदी झाल्या.  देशात एकूण २४, ८४९ उष्माघाताच्या घटनांची नोंद झाली. यामध्ये मध्य प्रदेशात सर्वाधिक  ६,५८४ उष्माघाताची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

हेही वाचा 

Nashik Malegaon Heat Wave | काळजी घ्या! शनिवारपर्यंत लाट कायम राहणार, मालेगाव ४३, नाशिकचा पारा 41.8
Heat wave : उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट, दक्षिणेत मुसळधारेचा इशारा
Heat wave : मे महिन्यात ८ ते ११ दिवस उष्णतेची लाट; विदर्भ-मराठवाड्याचाही समावेश