वर्धा : आगीमध्ये चार दुकानांची जळून खाक, अडीच लाख रुपयांचे नुकसान

वर्धा : आगीमध्ये चार दुकानांची जळून खाक, अडीच लाख रुपयांचे नुकसान

वर्धा, Bharat Live News Media वृत्तसेवा : चितोडा मार्गावरील सिद्धार्थनगर परिसरात चार दुकानांना शुक्रवारी (दि.31) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये चार दुकानांचे सुमारे 2 लाख 45 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आग लागल्यानंतर काही वेळातच या आगीने लगतच्या दुकानांनाही कवेत घेतले. स्थानिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे प्रमाण वाढल्याने याकरिता अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. आगीमध्ये चार दुकानाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : 

कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन
नागपूर : कळमना येथे आढळले पिता-पुत्राचे अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह
डेक्कन क्वीनचा 95 वाढदिवस जल्लोषात साजरा