धक्कादायक! पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने पिकअपने युवकाला चिरडले

धक्कादायक! पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने पिकअपने युवकाला चिरडले

शिक्रापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरण चर्चेत असतानाच शिरूर तालुक्यातील आरणगाव येथे आणखी एक दुर्घटना घडली. येथील पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने पिकअप चालवत असताना मोटारसायकलला समोरून जोरदार धडक देत सुमारे ३० फूट मागच्या चाकाखाली फरपटत नेल्याने अरुण विठ्ठल मेमाणे (वय ३०) याचा मृत्यू झाला, तर महेंद्र रावसाहेब बांडे दोघेही (रा. वडगाव बांडे, ता. दौंड) हे गंभीर जखमी झाले.
शुक्रवारी (दिं. ३१ मे) सकाळी सव्वादहाच्या सुमारास मयत अरुण विठ्ठल मेमाणे व त्याचा मित्र महिंद्र बांडे असे दोघे सप्लेंडर मोटार सायकलने (एमएच १२ एसएफ ३४३९) डिपीचे ऑइल आणण्यासाठी वडगावबांडे येथुन न्हावरे येथे जात होते. या वेळी अरणगावातील पिकअप (एमएच १२ एसएफ ३४३९) यावरील अल्पवयीन चालकाने समोरुन ठोस देवुन मोटार सायकलसह चालकास २० ते ३० फुट फरफटत नेल्याने अपघातात अरुण विठ्ठल मेमाणे व त्याचा मित्र महिंद्र रावसाहेब बांडे जखमी झाले. फोनवर माहिती मिळताच घरातील नातेवाईकांनी तेथे ठिकाणी जावुन पाहणी केली असता अपघातग्रस्त पिकअप अरुण मेमाणे यांच्या अंगावर गेलेला होता व सोबत त्याची मोटार सायकल देखील पिकअपच्या खाली पडलेली होती.
पिकअपचे बाजुला महिंद्र बांडे हा जखमी अवस्थेत असल्याने जमलेल्या लोकांनी तातडीने अरुण व त्याचा मित्र महेंद्र बांडे या दोघांनाही शिरुर येथील दवाखान्यात हलविले. परंतु उपचारापुर्वीच अरुण मेमाने याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अरणगाव (ता. शिरूर)चे पोलीस पाटील संतोष निवृत्ती लेंडे यांनी त्यांच्या १५ वर्ष अल्पवयीन मुलीला त्यांचे मालकीचे पिकअप चालवण्यास दिले व ते स्वतः बाजुला बसले होते. या अपघातानंतर खबर न देता ते तेथुन निघुन गेले. याप्रकरणी पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे व अल्पवयीन मुलगी यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. या अपघात प्रकरणी मयत युवकाचा भाऊ सतीश विठ्ठल मेमाणे यांनी शिक्रापूर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली.
हेही वाचा

खा. सुप्रिया सुळेंकडून भिकुले कुटुंबीयांचे सांत्वन
निवडणूक विशेष : सट्टा बाजारात मोदी, भाजपला कौल
काळजी घ्या! पॅरासिटॅमॉल डोसमध्ये वयानुसार बदल