अखेरच्या टप्प्यात मताधिकाराचा उत्साह; सकाळी ९ पर्यंत ११.३ % मतदान

अखेरच्या टप्प्यात मताधिकाराचा उत्साह; सकाळी ९ पर्यंत ११.३ % मतदान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांत आज (दि.१) मतदान होत आहे. देशात सकाळी 9 पर्यंत 11.3 %  मतदान ट्क्के नोंद झाले आहे. Lok Sabha Election 2024
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात  आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांत आज (दि.१) मतदान होत आहे. सकाळी ७ वा. पासून मतदान सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात १० कोटी ६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५ कोटी २४ लाख पुरुष आणि ४ कोटी २८ लाख महिला मतदारांचा समावेश आहे. अखेरच्या टप्प्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १३ जागांवर मतदान होत आहे. याशिवाय पश्चिम बंगाल ९, बिहार ८, ओडिशा ६, हिमाचल प्रदेश ४, झारखंड ३ व चंदीगडमधील एका जागेवर मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी निवडणूक निकाल लागणार आहे.
मतदान पार पडताच सगळ्यांच्या नजरा एक्झिट पोलकडे
मतदान पार पडताच सगळ्यांच्या नजरा एक्झिट पोलकडे लागणार आहेत. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच ३ केंद्रीय मंत्र्यांचे नशीब ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. मोदी हे वाराणसी मतदारसंघातून तर केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय चंदौली येथून, अनुप्रिया पटेल मिर्झापूरमधून आणि राज्यमंत्री पंकज चौधरी महाराजगंज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत
यंदा लोक’सभा निवडणुका एकुण सात टप्प्यात होत आहेत. या सात टप्प्यातील सहा टप्प्यातील मतदान झाले आहे. तर अखेरच्या सातव्या टप्प्याचे मतदान आज (दि.१) मतदान होत आहे.
1) 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान, 102 जागा.
2) 26 एप्रिलला दुसर्‍या टप्प्याचे मतदान, 89 जागा.
3) 7 मे रोजी तिसर्‍या टप्प्याचे मतदान, 94 जागा.
4) 13 मे रोजी चौथ्या टप्प्याचे मतदान, 96 जागा.
5) 20 मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान, 49 जागा.
6) 25 मे रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान, 57 जागा.
7) 1 जूनला सातव्या टप्प्याचे मतदान, 57 जागा. (मतदान होत आहे.)
हेही वाचा 

Income Tax Department | लोकसभा निवडणुकीदरम्यान आयकर विभागाची मोठी कारवाई; ११०० कोटींची मालमत्ता जप्त
लोकसभा निवडणूक 2024 : शेवटच्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या
लोकसभा रणसंग्राम 2024 | चुरशीची लढत; उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद