नागपूर : पोहण्यासाठी गेलेले तीन जण बुडाले, दोन मृतदेह सापडले

नागपूर : पोहण्यासाठी गेलेले तीन जण बुडाले, दोन मृतदेह सापडले

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात पोहण्याचा मोह झाल्याने तलावात गेलेले तीन जण  पाण्यात बुडाले. ही घटना आज (दि.31) उघडकीस आली. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध दुपारपर्यंत सुरू होता. जगदीश खरे यांच्या मदतीने पोलिसांनी हे मृतदेह बाहेर काढले. उमरेड तालुक्यातील मटकाझरी तलावावर ही घटना घडली.
विदर्भात उन्हाचा पारा चढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. अशावेळी काहीसा दिलासा मिळावा म्हणून 12 वर्षीय मुलासह दोघेजण पोहण्यासाठी तलावावर गेले होते. मात्र पोहताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. एकमेकाला वाचवण्याच्या नादात हे तिघेही बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तलावर मोठी गर्दी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरेडच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. जितेंद्र शेंडे (35), संतोष बावणे (25), आणि निषेध पोपट (12) वर्षे अशी बुडालेल्यांची नावे आहेत. या घटनेचा पुढील तपास कुही पोलीस स्टेशनचे निरीक्षक बिदुरकर, उपनिरीक्षक देविदास ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.
Latest Marathi News नागपूर : पोहण्यासाठी गेलेले तीन जण बुडाले, दोन मृतदेह सापडले Brought to You By : Bharat Live News Media.