तळेगाव रेल्वे स्टेशनची दुरवस्था

तळेगाव रेल्वे स्टेशनची दुरवस्था

तळेगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे येथील रेल्वे स्टेशनचे विकास कामाबाबत गेली सहा महिन्यांपुर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑन लाईन भूभिपूजन होवून ३६ कोटी विकासनिधी मंजूर करण्यात आला. कामेही सुरु करण्यात आली होती.परंतु आता मात्र कामे ठप्प झाली असुन जी चालु आहे ते संथ गतीने चालु आहेत यामुळे स्टेशनची दुरवस्था झालेली आहे.
स्टेशनवरील प्लॉट फार्मच्या जुन्या फरशा काढण्यात आलेल्या असुन तेथे नवीन फरशा बसविण्याचे काम ठप्प झालेले आहे. यामुळे प्रवाशांना गैरसोयीचे होत असुन अधून मधुन तेथे धुळीचे कण उडून प्रवाशांना त्रासदायक होत आहे. Bharat Live News Mediaच्या प्रतिनिधीने तळेगाव रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून संथ गतीने चाललेल्या कामांबाबत चौकशी केली असता ते ठेकेदारांकडे चौकशी करा असे सांगतात.
तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन येथुन मुंबईच्या आणि पुणेच्या दिशेने अनेक रेल्वे गाड्या जात-येत असतात.तसेच दररोज लोणावळा-पुणे-लोणावळा अशा लोकल रेल्वेच्या फे-या पहाटे पासुन रात्री उशिरापर्यंत सतत असतात. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आकुर्डी,पिंपरी चिंचवड पुणे, लोणावळा आदी ठिकाणी जात-येत असतात.तसेच अनेक चाकरमणी कामगार पुणे-मुंबईकडे जात-येत असतात. व्यावसायीकही बाहेरगावी जात-येत असतात. यामुळे तळेगाव रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असुन त्या मानाने तेथे सुविधा नाहीत. बाकडे अपुरे असून अनेक बाकडे तुटलेल्या अवस्थेत आहेत.
प्रतिक्षागृहात अस्वच्छता
सध्या उन्हाळा असल्यामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु तेथे पंख्याची व्यवस्था अपुरी आहे. प्रतिक्षागृहात अस्वच्छता आहे. तेथे डासांचे आणि भटक्या प्राण्यांचे साम्राज्य आहे. कामकरण्यासाठी अनेक सुस्थितील बाकडे काढुन ठेवले आहेत. काम मात्र संथ गतीने चालु आहे.Bharat Live News Mediaच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता हे दिसुन आले. आता लवकरच पावसाळा सुरु होणार आहे त्यावेळी स्टेशनच्या दुरवस्थेत आणखी भर पडणार आहे आणि रेल्वे प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे. तरी रेल्वे प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी अशी रेल्वे प्रवाशांची मागणी आहे.
विकास कामे संथगतीने चालु असून रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
-तानाजी गडकर, प्रवासी संघटना कार्यकर्ता
तळेगाव रेल्वे स्टेशन येथे सिलींग फॕनची व्यवस्था अपुरी असुन ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना त्रासदायक होत आहे.
– ऋतुज कल्याणी, रेल्वे प्रवाशी

हेही वाचा 

नाशिक: ग्रामीण पाठोपाठ शहरातील नागरिकही पाणीटंचाईने त्रस्त
पंढरपूर : विठ्ठलाचे सोने, चांदीचे दागिने कधी वितळवणार?
गणपतीपुळेत समुद्राची पाणी पातळी वाढली; यंदाही मोठ्या लाटांची भीती