पिंपळनेरमध्ये डोंगराची काळी मैना दाखल

पिंपळनेरमध्ये डोंगराची काळी मैना दाखल

पिंपळनेर (जि.धुळे) Bharat Live News Media वृत्तसेवा: साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरात आदिवासी पश्चिम पट्ट्यातून दरोरोज रानमेवा विक्रीसाठी येत आहे. यात डोंगराची काळी मैना म्हणजे करवंद, जांभूळ, आंबा यांची मोठी आवक होत असल्याने आदिवासी महिला विक्रीसाठी घेऊन येतात. सध्या हंगाम सुरू असल्याने 15 ते 20 करवंदाच्या पाट्या, तीन ते चार जांभळाच्या तसेच 40 ते 50 आंब्याच्या पाट्या येतात. जांभूळ व करवंद जंगलातून सापडतात.
पश्चिम पट्ट्यात करवंदाच्या जाळ्यांचे जंगल मोठ्या प्रमाणात आहे. करवंदे एकेक तोडून गोळा करावी लागतात. त्यामुळे एका दिवसात दोन ते तीन महिलांकडून एक टोपले (10 ते 15 किलो) तोडले जात असतात. करवंद तोडणे फार जिकिरीचे असल्याने करवंदाच्या झाडाला मोठमोठे काटे असतात. जाळ्यांवर चढून किंवा शिडीच्या सहाय्याने करवंद तोडली जातात. ती एकत्र गोळा करून सकाळी सकाळी आदिवासी महिला बांधव पिंपळनेरच्या बाजारपेठेत हा रानमेवा विक्रीसाठी येऊ लागला आहे.
बेसुमार वृक्षतोड व निसर्गाच्या लहरीपणामुळे ही करवंदे आता दुर्मिळ होत असल्याचे चित्र आहे.मोसमी पावसाच्या आगमनात ही करवंदे झाडावरून गळून पडतात.यातच रखरखत्या उन्हाळ्यात विक्रीसाठी येणाऱ्या हंगामी फळांमध्ये रानमेवा म्हटल्या जाणाऱ्या फळांची मेजवानी काही औरच असते.काही फळे तर डोंगराच्या कड्याकपाऱ्यांत बहरलेली असतात.यातील काटेरी जाळ्यांत फुलणारी,चवीने गोड,आंबट,मध्ये गुलाबी व बाहेरून काळ्या रंगाची करवंदे दिसल्यास तोंडाला पाणीसुटल्याशिवाय राहत नाही.
करवंदामध्ये काय असतं, उपयोग काय?

या करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्वचा विकारांवर तसेच मधुमेही रुग्णांसाठी ती फायदेशीर ठरतात.
यातील सायट्रीक ऍसिडच्या मुबलक प्रमाणामुळे उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर करवंद खाणेही लाभदायक ठरते.
गावासह परिसरात विक्रीसाठी येणारा हा रानमेवा भाव खात आहे.

या गावातून व्यापारी येतात करवंद खरेदीसाठी
धुळे, साक्री, कासारे, धाडणे, निजामपूर, दहीवेल, नेर, नंदुरबार, नवापूर, दोंडाईचा, कासारे, ताहाराबाद येथील व्यापारी खरेदीसाठी येतात.
करवंदाच्या जाळ्या कुठं
आदिवासी पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांतील जंगलात करवंदाच्या जाळ्या आहेत. त्यात सिताडी, वार्सा, शिनपाडा, उमरपाटा, शेंदवड, मांजरी, बारीपाडा, महुपाडा अशा अनेक ठिकाणी डोंगराची काळी मैना पाहायला व खायला देखील मिळते.
असा मिळतोय भाव
पिंपळनेर येथून बाहेरगावाहून येणारे व गावातील व्यापारी देखील खरेदी करतात. एखाद्या वेळेस आवक जास्त असते, तर एखाद्या वेळेला कमी. आवक वाढली तर भाव कमी मिळतो कमी आवक राहिली तर जास्त असतो. सकाळी 400 ते 500 रुपयांना एक टोपले, 10 ते 12 किलो वजनाची पाटी, 50 ते 60 रुपये किलो तर मापी 20 ते 25 रुपये पावशेर असे दिले जातात.
हेही वाचा –

प्रतीक्षा संपली! ‘आम्ही जरांगे’ यादिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
Nashik Crime | पोलिस असल्याचे सांगत वृद्धास गंडा, सोन्याचे दागिने पळवले