दारुबंदीसाठी महिला आक्रमक; अवैध धंद्यांकडे पोलिसांची डोळेझाक

दारुबंदीसाठी महिला आक्रमक; अवैध धंद्यांकडे पोलिसांची डोळेझाक

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील करडवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ होणारी दारुविक्री त्वरित बंद करावी, या मागणीसाठी तेथील महिलांनी पाथर्डीत जाऊन पोलिस अधिकार्‍यांची भेट घेतली. मात्र, कारवाई करण्याऐवजी त्यांनी हात झटकून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे बोट दाखविले.
गुंडाना आशीर्वाद कुणाचे?
करडवाडी येथे दहा वर्षांपासून दारूविक्री केली जाते. दोन ठिकाणी राजरोजपणे दारूविक्री होत असून, दारु विकणारे गुंड प्रवृत्तीचे लोक कायदा धाब्यावर बसून तरुणांना व्यसनाधीन बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना कोणाचे आशीर्वाद आहेत? असा सवाल यावेळी पोलिसांना विचारण्यात आला आहे.
यापूर्वी अनेकदा पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागालाही लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही गावात अवैध दारूविक्री सुरूच आहे. अनेक लोकांचे कुटुंब दारूमुळे उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.
प्रशासनाची डोळेझाक का?
गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या फायद्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासन का दुर्लक्ष करते. कारवाई करण्यास कोणती अडचणी येत आहे? गावातील दारू कधी बंद होणार? असा सवाल महिलांनी केला.
दारूविक्रीमुळे शिक्षण घेणार्‍या लहान मुलांवरही मोठा विपरित परिणाम होत असून, याकडेही प्रशासनाने गांभीर्या लक्ष देण्याची गरज आहे. यावेळी शारदा टापरे, लीला पालवे, शीला गर्जे, राणी गर्जे, प्रतिभा गर्जे, शारदा गर्जे, जनाबाई टापरे, मालन नाकाडे, नंदाबाई कराड, शोभा कराड, सिंधूबाई टापरे, नंदा घुले, वच्छला कराड, सीमा गर्जे, पदम कराड, आदिनाथ गर्जे, संतोष जाधव, संतोष टापरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 | शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचारतोफा आज थंडावणार
ऑप्टिक फायबरच्या जाळ्यासाठी पुन्हा होणार खोदाई!
ऑप्टिकल फायबरची निविदा वादात : एका दिवसात सर्व कार्यवाही