सैफ अली खानच्या ‘या’ दुसऱ्या बहिणीबद्दल माहिती आहे का?

सैफ अली खानच्या ‘या’ दुसऱ्या बहिणीबद्दल माहिती आहे का?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सैफची बहिण अभिनेत्री सोहा अली खान सर्वांनाच माहिती आहे. पण, सैफच्या मोठ्या बहिणीबद्दल फारशी माहिती समोर आली नाही. वयाच्या ४८ व्या वर्षीही सैफ अली खानच्या मोठ्या बहिणीने लग्न केलेले नाही. सैफच्या मोठ्या बहिणीचे नाव आहे सबा अली खान (सबा पतौडी). ती लाईमलाईटपासून नेहमीच दूर राहते.

अधिक वाचा-

आमिर खानचा मुलगा जुनैद खानचे ‘महाराज’मधून डेब्यू, पोस्टर लाँच

कोटींची मालकीण आहे सबा अली खान
सैफ, सोहा आणि सबा अली खान दिग्गज अभिनेत्री शर्मिला टॅगोरची मुले आहेत. सैफ आणि सोहाने आपल्या आईप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. पण, सबा खान नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहिली.

सबा अली खान सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. ती आपल्या फॅमिलीसोबत फोटो देखील शेअर करते. सबा ४२ वर्षांची आहे. ती पेशाने एक ज्वेलरी डिझायनर आहे. आतापर्यंत तिने लग्न केलेले नाही. आपल्या लाजाळू स्वभावामुळे ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहते.

अधिक वाचा-

हॉट आहे शर्वरी वाघ; ‘मुंज्या’मध्ये तरस गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स

सबा अली खानची संपत्ती ऐकून व्हाल आश्चर्यचकित
तुम्हाला आश्चर्य वाटेल की, चित्रपटांपासून दूर असणारी सबा २७०० कोटींची मालकीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सबा ही पटौदी सर्व संपत्तीचे काम सांभाळते. तिची एक संस्था देखील आहे. या संस्थेची ती मुख्य असून सर्व हिशेब ती ठेवते.
सबा अली खान अविवाहित का आहे, केलाय खुलासा
रिपोर्टनुसार, सबा अली खान पेशाने टॅरो कार्ड रीडर आणि ज्वेलरी डिझायनर आहे. तिने एका मुलाखतीत खुलासा देखील केला होता की, तिने अद्यापपर्यंत लग्न का केले नाही?

सबा अली खान म्हणाली, ‘मला अजून माझा सोलमेट भेटला नाही. माझ्यासाठी लग्नाचा अर्थ केवळ सेटल होणे नाही तर असा एक मित्र हवा आहे, ज्याच्यासोबत मी मीनिंगफुल बातचीत करू शकेन. ‘माझ्यासाठी लुक्स आणि पैसे महत्त्वाचे नाहीत. मला एक सोलमेट म्हणून चांगला मित्र हवाय आणि मला माहिती आहे की, एक दिवस तो मला नक्की भेटेल.’ ‘लग्न मी नक्की करेन. पण आता नाही. कारण लग्न हा जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. . त्यामुळे मला असं वाटतं की, कदाचित माझ्यासाठी ही वेळ अजून आलेली नाही.’ सबा म्हणाली – ‘कधी काय होईल, कुणाला माहिती. मला माहिती आहे, पुढे जे होईल, ते सर्व चांगले होईल..’
अधिक वाचा-

‘भूल भुलैया ३’ च्या सेटवरून फोटो आले समोर; माधुरी, तृप्ती, विद्या बालन हॉट अभिनेत्री एकत्रित