आत्मसमर्पणापूर्वीच केजरीवालांचा जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज

आत्मसमर्पणापूर्वीच केजरीवालांचा जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आत्मसमर्पणाच्या मुदतीच्या अवघ्या ३ दिवस आधी राऊस एव्हेन्यू कोर्टात जामीन याचिका दाखल (Arvind Kejriwal) केली आहे. सत्र न्यायालय आज दुपारी २ वाजता आम आदमी पार्टी संयोजकांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीनामध्ये ७ दिवसांची  मुदतवाढ मिळण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. आरोग्याच्या काही तपासण्या करण्यासाठी केजरीवलांनी (Arvind Kejriwal) जामीन वाढवून मागितला होता. परंतु जामिनाची मुदत वाढवण्याच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता केजरीवालांनी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. केजरीवालांच्या या याचिकेवर आज (दि.३० मे) दुपारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
केजरीवालांना जामीनाला मुदतवाढ कशासाठी?

वैद्यकीय चाचण्यांसाठी सात दिवसांची मुदतवाढ हवी
वजन कमी झाले असून केटोन पातळी अत्यंत वाढली आहे.
‘पीएटी-सीटी स्कॅन’सह काही वैद्यकीय चाचण्यां करणे आवश्यक

Delhi CM Arvind Kejriwal moves Trial Court (Rouse Avenue Court) with a regular bail plea in Excise money laundering case.
(file pic) pic.twitter.com/r4aXusXmZG
— ANI (@ANI) May 30, 2024

 

Go to Source