नागपूर : दाभा परिसरात बिबट्याची दहशत

नागपूर : दाभा परिसरात बिबट्याची दहशत

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा परिसरात बिबट्या शिरल्याच्या वृत्ताने आज गुरुवारी सकाळपासून खळबळ उडाली आहे. येथील रहिवाश्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने परिसरातील एका व्यक्तीला उचलून नेल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. गिट्टीखदान पोलिसांनी मात्र बिबट्याने व्यक्तीला उचलून नेल्याचे खोटे असल्याचे म्हटले आहे.
हा बिबट्या गोरेवाड्यातून या परिसरात शिरल्याचे सांगितले जात आहे. दाभा येथील रहिवासी क्षेत्रात बिबट्या शिरल्याची माहिती पोलिस विभागाला कळताच त्यांनी वन विभागासोबत शोधाशोध सूरु केली. यापूर्वीही दाभा भागात अनेकदा बिबट्या दिसला आहे. बिबट्याने काही भटक्या कुत्र्यांनाही मारल्याचे समोर आले होते. गोरेवाडा बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाजवळील निवासी भागातही १६ मे रोजी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते.
हेही वाचा : 

गडचिरोली: भर झोपेत कुऱ्हाडीने वार करुन पत्नीचा खून, पतीला अटक
नागपूर : दोन महिलांना कारची जबर धडक, व्हिडिओने खळबळ