चार वर्ष झोपला होता का?:गेम झोन अग्‍निकांडाप्रकरणी हायकोर्टाने फटकारले

चार वर्ष झोपला होता का?:गेम झोन अग्‍निकांडाप्रकरणी हायकोर्टाने फटकारले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : तुम्‍ही गेली चार वर्ष झोपला होता का, आमचा आता सरकावर विश्‍वास राहिला नाही, अशा शब्‍दांमध्‍ये राजकोट गेम झोन अग्‍निकांडाप्रकरणी गुजरात उच्‍च न्‍यायालयाने अधिकार्‍यांना फटकारले. राजकोटमधील गेमिंग झोनमध्‍ये शनिवारी रात्री आगीत १२ मुलांसह ३३ जणांचा बळी गेला होता. या प्रकरणाची गुजरात उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल (suo motu) घेतली होती.
राजकोट गेम झोमध्‍ये लागलेली आग मानवनिर्मित आपत्ती
राजकोट गेम झोमध्‍ये लागलेली आग मानवनिर्मित आपत्ती
गेम झोन अग्‍निकांडाप्रकरणी न्यायमूर्ती बिरेन वैष्णव आणि न्यायमूर्ती देवन देसाई यांचा खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, “राजकोट गेम झोमध्‍ये लागलेली आग ही एक मानवनिर्मित आपत्ती आहे. यामध्‍ये लहान मुलांचे निष्पाप जीव गमावले गेले आहेत. अशा करमणुकीच्या सुविधा सक्षम अधिकाऱ्यांकडून पुरेशा मंजूरीशिवाय अस्तित्वात आल्या होत्‍या.”

“Man-made disaster”: Gujarat High Court takes suo motu cognisance of Rajkot gaming zone fire
Read more here: https://t.co/BXmSyMVCTc pic.twitter.com/AZnPhDzwVt
— Bar and Bench (@barandbench) May 27, 2024

राजकोट अग्‍निकांडातील मृतांची संख्‍या ३३ वर
गुजरातमधील राजकोट शहरातील कलावद रस्त्यावरील टीआरपी मॉलमधील गेम झोनमध्ये शनिवारी दुपारी भीषण आग लागली हाेती. या भीषण दुर्घटनेत 12 लहान मुलांसह ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी ‘डीएनए’ टेस्ट केली जाणार आहे. गेम झोन पूर्णपणे जळून खाक झाला आहे. गेम झोनमध्ये अनेक ठिकाणी दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लाय व लाकडाचे तुकडे पसरलेले होते. उपस्थित कर्मचार्‍यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. अवघ्या 30 सेकंदांत आग संपूर्ण गेम झोनमध्ये पसरली होती.
हेही वाचा : 

Stock Market Updates | ब्रेकिंग! सेन्सेक्स प्रथमच ७६ हजारांवर; निफ्टी २३,१०० पार
मालेगाव गोळीबाराने बनले हॉटस्पॉट! झोडगे येथे पेट्रोलपंपावर अज्ञातांकडून गोळीबार
Cyclone Remal : चक्रीवादळाला नाव कसे देतात? ‘रेमल’चा नेमका अर्थ तरी काय?