Pune Crime News : सराफाला लुटणाऱ्या तिघांना दिल्लीतून बेड्या

Pune Crime News : सराफाला लुटणाऱ्या तिघांना दिल्लीतून बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बी. टी. कवडे रस्त्यावर सराफ व्यावसायिकावर आठ राऊंड फायर करुन लुटमार करणार्‍या चोरट्यांच्या टोळीला वानवडी पोलिसाच्या पथकाने दिल्ली येथून बेड्या ठोकल्या आहेत. झटपट पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी लुटीत सामील झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांना 20 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बिलाल अहमद असदअली त्यागी (वय-३४, सिलमपुर, उत्तरपूर्व दिल्ली, मूळ मुज्जफरनगर उत्तरप्रदेश), हानी जीते वाल्मिकी(वय-२६, साऊथ वेस्ट दिल्ली), सागर राज कुमार (वय-२५, रा. नॉर्थ वेस्ट दिल्ली), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
प्रतीक मदनलाल ओसवाल (वय 30, रा. मुंढवा) असे जखमी झालेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. हडपसर भागातील सय्यदनगर परिसरात ओसवाल यांची सराफी पेढी आहे. 8 नोव्हेंबर रोजी सराफी पेढी बंद करुन रात्री साडेनऊच्या सुमारास प्रतीक आणि त्यांचे वडील मदनलाल बी. टी. कवडे रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी बिलाल त्याच्या दोन साथीदारांनी दुचाकीवर पाठलाग करत दोघांना बी. टी. कवडे रस्त्यावरील अंधारात अडवले. आरोपींनी प्रतीक हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला असता प्रतीकने विरोध केला.
यावेळी आरोपीने प्रतीक् दोन्ही पायावर व गालावर गोळ्या झाडल्या होत्या. आणि त्यांच्याकडील सोने लुटून आणि रोख 10 हजार आरोपी घेऊन पसार झाले. सराफाला लुटल्यानंतर आरोपींचा शोध सुरू होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले होते. तांत्रिक विश्लेषणानंतर व पोलिसांनी लागलीच गुन्ह्याचा तपास सुरू केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना आरोपी हे दिल्लीत पळून गेल्याची मिळाली होती.
उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस अमंलदार संतोष नाईक, संतोष साळवे, विष्णु सुतार, अमजद पठाण, अतुल गायकवाड, अजय केसरकर ही कारवाई केली. यांच्या पथकाने तिघांच्या दिल्ली येथून मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेल्या बिलाल नावाचा आरोपी हा दुबई येथे राहुन आला असून तो पुण्यातील रामटेकडी परिसरात राहण्यास होता.
त्याने आपल्या साथीदारांना दिल्ली येथून पुण्यात आणून त्याच्यावर ओसवाल यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी रेकी केली होती. त्यानंतर गुन्हा करून आरोपी पुन्हा दिल्ली येथे पळून गेले होते. दरम्यान या गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन हे चोरीचे असल्याची माहिती युनिट 5 चे पोलीस निरीक्षक महेश बोळकोडगी यांना मिळाली होती. आरोपी बिलाल त्यागी याने सर्फराज हनीफ शेख (वय 23, रा. रामटेकडी) याच्या मदतीने दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला बोळकोडगी यांच्या पथकाने अटक केली.
गुन्हा केल्यानंतर आरोपी हे दिल्ली येथे पळून गेल्याची माहिती तांत्रिक विश्लेषणावरून पुढे आली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने आरोपींना दिल्ली येथून ताब्यात घेत अटक केली. तिघांनाही न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
– संजय पतंगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस ठाणे.

हेही वाचा
गोव्यात आणले जाणारे 15 कोटींचे ड्रग्ज मुंबईत जप्त
Kolhapur Crime | कोल्हापूर हादरले! तासाभरात दोन खून
Pune Drugs Case : ड्रग प्रकरणात आणखी चार आरोपींची नावे
The post Pune Crime News : सराफाला लुटणाऱ्या तिघांना दिल्लीतून बेड्या appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बी. टी. कवडे रस्त्यावर सराफ व्यावसायिकावर आठ राऊंड फायर करुन लुटमार करणार्‍या चोरट्यांच्या टोळीला वानवडी पोलिसाच्या पथकाने दिल्ली येथून बेड्या ठोकल्या आहेत. झटपट पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी लुटीत सामील झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांना 20 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बिलाल अहमद असदअली त्यागी (वय-३४, सिलमपुर, उत्तरपूर्व दिल्ली, …

The post Pune Crime News : सराफाला लुटणाऱ्या तिघांना दिल्लीतून बेड्या appeared first on पुढारी.

Go to Source