शिक्षकांना अतिरिक्‍त ठरविणारे निर्णय रद्द करा: विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी

शिक्षकांना अतिरिक्‍त ठरविणारे निर्णय रद्द करा: विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी

नागपूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : शाळांमधील संरचनात्‍मक बदल आणि संचमान्यतेचे सुधारित निर्णय, निकष लक्षात घेता स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ निर्णयामुळे राज्‍यातील मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्‍त होऊन मराठी माध्यमाच्या शाळा डबघाईस येतील, अशी भीती आमदार सुधाकर अडबाले यांनी केली असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षण संघांने केली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेचे सुधारित निकष व दर्जावाढ करण्याबाबतच्‍या दोन्‍ही शासन निर्णयावर राज्‍यातील शिक्षकवर्ग तीव्र संताप व्‍यक्‍त करीत आहेत. यामुळे शिक्षक हित लक्षात घेता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात विदर्भातील सर्व जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्यामार्फत राज्य शासनास निवेदन सादर करीत याविषयी निषेध नोंदविण्यात आला.
शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक असणारा सुधारीत संच मान्यतेचा व दर्जावाढ करण्याबाबतचा १५ मार्च २०२४ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत आपण येत्‍या पावसाळी अधिवेशनात सभागृहात प्रश्‍न लावून धरणार असल्‍याचे विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले. सोबतच विमाशि संघाच्या वतीने शासन निर्णय रद्द न झाल्‍यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला.
यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्‍विनी सोनवणे, शिक्षण विस्‍तार अधिकारी चालखुरे, समाज कल्‍याण अधिकारी पेंदाम यांच्यासह खाजगी शिक्षणसंस्था संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनील शिंदे, जगदीश जुनगरी, विमाशी संघाचे जिल्‍हा अध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्‍हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, मारोतराव अतकरे, लक्ष्मण धोबे, विज्युक्टा अध्यक्ष डॉ. प्रविन चटप, महानगर अध्यक्ष जयंत टोंगे, कार्यवाह सुरेंद्र अडबाले, डॉ. विजय हेलवटे, शालीक ढोरे, कापसे, देवानंद चटप, सतीश अवताडे, शरद डांगे, शकील सर, देवेंद्र बलकी, सचिन मोहितकर, बलवंत विखार, प्रभाकर मते, प्रा. विधाते, प्रकाश कुंभारे, डॉ. धर्मा गावंडे, मोहन गंधारे, बंटी खटी, पेद्दीलवार व विमाशि संघाचे पदाधिकारी, सदस्‍य व शिक्षक आदी उपस्‍थित होते.
हेही वाचा 

पुणे-नागपूर विशेष रेल्वेला ‘लेट मार्क’; पुणे स्थानकावर प्रवासी ताटकळले
नागपूर : जोरदार वादळी पाऊस; जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात बिबट्या मांजराचे दर्शन