घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा :  घाटकोपरमध्ये मोठमोठे होर्डिंग लावणाऱ्या कंपनीचा संचालक भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांनी आज (दि. १६) केली. त्याला उदयपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला लवकरच मुंबई आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई ठाणे परिसरात सोमवारी (दि.१३) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यादरम्यान  घाटकोपरमध्ये वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला तर ७५ जण जखमी झाले. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जाहिरात एजन्सी या परिसरात होर्डिंग्ज लावण्यासाठी जबाबदार होती. या कंपनीचा भावेश भिडे हा संचालक असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला आज अटक करण्यात आली.
हेही वाचा :

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग्जप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : अंबादास दानवे

Mumbai Hoarding Collapse : धूळ वादळाचा मुंबईला तडाखा; घाटकोपरला अवैध होर्डिंग कोसळून 14 ठार

Mumbai Hoarding Collapse | घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : मृतांची संख्या १४ वर; ४३ जणांवर उपचार