बीड : मराठा आरक्षणासाठी गेवराई येथील तरुणाने जीवन संपवले

धोंडराई, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून तरूणाने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवल्याची घटना बुधवारी (दि.15) रात्री मौजे गंगावाडी (ता. गेवराई) येथे घडली. रामेश्वर कारभारी मते (वय 40) असे मृत तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे जीवन संपवत असल्याची चिठ्ठी मयत तरूणाच्या खिशात आढळून आली. अल्पभुधारक शेतकरी कुटुंबातील रामेश्वर मते …

बीड : मराठा आरक्षणासाठी गेवराई येथील तरुणाने जीवन संपवले

धोंडराई, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून तरूणाने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवल्याची घटना बुधवारी (दि.15) रात्री मौजे गंगावाडी (ता. गेवराई) येथे घडली. रामेश्वर कारभारी मते (वय 40) असे मृत तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे जीवन संपवत असल्याची चिठ्ठी मयत तरूणाच्या खिशात आढळून आली.
अल्पभुधारक शेतकरी कुटुंबातील रामेश्वर मते हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रीय कार्यकर्ते होते. अंतरवाली, मुंबई येथील आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता. मात्र यानंतरही आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून मते यांनी जीवन संपवले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई- वडिल, एक भाऊ असा परिवार आहे.
हेही वाचा :

Devendra Fadnavis On Rahul Gandhi | राहुल गांधींची २४ पक्षांची खिचडी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
केजरीवाल यांना जामीन देताना विशेष सवलत दिलेली नाही : सुप्रीम कोर्ट
बीड : नारायणगडमधील ८ जूनची ‘मराठा महासभा’ पुढे ढकलली