कोल्हापूर : भाततळी येथे मुसळधार पाऊस; टॉवर कोसळला

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : विशाळगड परिसरात गुरूवारी (दि.१६) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भाततळी येथे २५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला ७० फूट लांबीचा बीएसएनएलचा टॉवर कोसळला. विलास रावजी यांच्या घराशेजारी हा टॉवर उभा असल्याने त्यांच्या घराची काही कौले फुटली आहेत. मात्र, या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वादळी वाऱ्यामुळे परिसरातील काही घराची कौले …

कोल्हापूर : भाततळी येथे मुसळधार पाऊस; टॉवर कोसळला

विशाळगड; Bharat Live News Media वृत्तसेवा : विशाळगड परिसरात गुरूवारी (दि.१६) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भाततळी येथे २५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला ७० फूट लांबीचा बीएसएनएलचा टॉवर कोसळला.
विलास रावजी यांच्या घराशेजारी हा टॉवर उभा असल्याने त्यांच्या घराची काही कौले फुटली आहेत. मात्र, या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वादळी वाऱ्यामुळे परिसरातील काही घराची कौले व पत्रे उडून गेली. तर काही ठिकाणी झाडे  कोलमडून पडली. परिसरातील विजेच्या तारा तुटून पडल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला.