पतीने कुरकुरे दिले नाही म्हणून पत्नीने सोडले घर…गोष्ट गेली पोलिसांपर्यंत

पतीने कुरकुरे दिले नाही म्हणून पत्नीने सोडले घर…गोष्ट गेली पोलिसांपर्यंत

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आग्रा येथील एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यामध्ये पती-पत्नीमध्ये भांडणाचे कारण 5 रुपयांचे कुरकुरे आहे. पतीने पत्नीला 5 रुपयांची कुरकुरे न दिल्याने पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानतंर पत्नी चिडून माहेरी निघून गेली.
पाच रुपयांच्या कुरकऱ्यांमुळे नात्यात दुरावा

कुरकुरे न दिल्याने पत्नी पतीला सोडून माहेरी
महिलेने केली पोलीस ठाण्यात नवऱ्याविरूद्ध तक्रार
प्रकरण सोडवायला नातेवाईक समुपदेशन केंद्रामध्ये

कुरकुरे न दिल्यामुळे झालेल्या भांडणामुळे पत्नी पतीला सोडून माहेरी गेली. पत्नीला कुरकुरे खायला आवडतात. परंतु, पतीने तिला कुरकुरे खायला न दिल्यामुळे, पत्नीला राग आला. रागाच्या भरात  पत्नी पतीला सोडून आई-वडिलांच्या घरी गेली. एवढेच नाही तर पती-पत्नीमधील वाद इतका मोठा झाला की, या वादाची तक्रार पोलिसांत ठाण्यात करण्यात आली आहे.
प्रकरण गेले कौटुंबिक समुपदेशन केंद्रामध्ये
पोलिसांनी ही घटना कौटुंबिक समुपदेशन केंद्रामध्ये दाखल केली. त्यानंतर कुटुंब समुपदेशन केंद्रात पती-पत्नी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. आग्रा येथील कौटुंबिक समुपदेशन केंद्रातील समुपदेशकाने पती-पत्नी दोघांनाही समुपदेशनासाठी बोलावले आणि दोघांकडून प्रकरणाची अधिक माहिती घेतली.
फक्त सहा महिने पुरवले लाड
समुपदेशक डॉ.सतीश खिरवार यांनी सांगितले की, मुलीचा पती चांदी व्यापाराचे काम करतो. बायकोला लग्नाआधीच चविष्ट खाण्याची सवय होती. पत्नीने सांगितले की, तिच्या पतीने लग्नाच्या पहिल्या सहा महिन्यात तिची खूप काळजी घेतली, पण आता तो बदलला आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर माराहाण करतो.
समुपदेशामध्ये प्रकरण आटोक्यात
समुपदेशनामध्ये पतीने सांगितले की, त्याच्या पत्नीला कुरकुरे खाण्याची आवड आहे. तो तिला ऑफिसमधून घरी येताना रोज ५ रुपये किमतीचे कुरकुरे आणायचा. एके दिवशी तो कुरकुरे आणायला विसरला, त्यामुळे त्याची पत्नी चिडली. दोघांमध्ये भांडण होऊन पत्नी आई-वडिलांच्या घरी निघून गेली. पती-पत्नी दोघांचेही समुपदेशन करणारे कौटुंबिक समुपदेशक डॉ.सतीश खिरवार म्हणाले, पती-पत्नी दोघांनाही समजावून सांगितले आहे. या खटल्याला पुढील तारीख देण्यात आली असून, पुढील तारखेला दोघांमध्ये वाद संपेल अशी शक्यता आहे.
हेही वाचा :

 मद्यधोरण प्रकरणानंतर स्वाती मालिवाल प्रकरणामुळे ‘आप’ गोत्यात?
बीड :  नांदुरघाट येथे आक्षेपार्ह पोस्टवरून दोन गटात तणाव
बीड : मराठा आरक्षणासाठी गेवराई येथील तरुणाने जीवन संपवले