एसटीने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने आज्ञात चोरट्याने केले लंपास

खांब (श्याम लोखंडे ): एसटीचा प्रवास एका महिलेला महागात पडला आहे. लाल परीत चोरटे सोन्यावर डल्ला मारत असल्याने आता प्रवास करणाऱ्या महिलांच्यात संतापाची लाट उसळली आहे. प्रवासात चोरटे डल्ला मारत असल्यामुळे महिलांच्या प्रवासाची चिंता वाढली आहेत. एसटी प्रवासात चोरट्यांची संख्या वाढल्याने त्यांचा प्रवास धोक्याचा झाला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. तर सदरची घटना ही माणगाव …

एसटीने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने आज्ञात चोरट्याने केले लंपास

खांब (श्याम लोखंडे )

खांब (श्याम लोखंडे ): एसटीचा प्रवास एका महिलेला महागात पडला आहे. लाल परीत चोरटे सोन्यावर डल्ला मारत असल्याने आता प्रवास करणाऱ्या महिलांच्यात संतापाची लाट उसळली आहे. प्रवासात चोरटे डल्ला मारत असल्यामुळे महिलांच्या प्रवासाची चिंता वाढली आहेत. एसटी प्रवासात चोरट्यांची संख्या वाढल्याने त्यांचा प्रवास धोक्याचा झाला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. तर सदरची घटना ही माणगाव कोलाड दरम्यानच्या प्रवासात घडली असून सर्वत्र खळबळ माजली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीमती सविता पांडुरंग शेडगे (वय 40, रा. मनिषा नगर कळवा ठाणेठेमुरा मालुस्ते ता. माणगांव) जिल्हा रायगड या एसटी बसमध्ये माणगाव कोलाड दरम्यानच्या प्रवास करत होत्या. यांचेकडील दागिने तसेच रोख रक्कमसह पर्स एका आज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.१३ मे) रोजी सकाळी १०:४५ वाजता घडली. त्यामुळे आता एसटी बसमध्ये प्रवास करणे ही बाब महिलांसाठी धोक्याची झाली असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. याबाबत कोलाड पोलिस ठाण्यात चोरीबाबतची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरिक्षक मोहिते यांच्या सह सहकारी यांनी घटनस्थळाला भेट दिली. तर कोलाड पोलिसांकडून या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी वेळी व ठिकाणी यांतील फिर्यादी या त्यांचे राहते घर (मालुस्ते ता. माणगांव जि. रायगड) येथून ठाणे येथे जाणेकरीता माणगांव बस स्थानक वरून श्रीवर्धन ते ठाणे या बसमधुन प्रवास करित होत्या. बस कोलाड बस थांबा येथे आलेवेळी फिर्यादी यांच्या पर्समधील दागिने व रोख रक्कम बसमधुन कोणातरी अज्ञात इसमाने चोरल्याचे समोर आले आहे.