कणकवली तालुक्यात अवकाळी पाऊस

कणकवली तालुक्यात अवकाळी पाऊस

कणकवली, Bharat Live News Media वृत्तसेवा: मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात गेले काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान सिंधुदुर्गातील काही भागात सतत असाच पाऊस सुरू आहे. गुरुवारी (दि.१६ मे) दुपारी २ वाजताच्या सुमारास कणकवली तालुक्यातील फोंडाघाट व कनेडी परिसरात जोरदार पाऊस झाला. सकाळपासूनच उष्णतेचे प्रमाण वाढलेले असतानाच दुपारी वादळी वाऱ्यासह अचानक पावसाने हजेरी लावली. सध्या गावागावात आंब्याचा सिझन सुरू आहे. त्यातच पाऊस पडू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. (Unseasonal Rain)