भारतीय फुटबॉलचा ‘जादुगार’ सुनील छेत्री होणार निवृत्त!

भारतीय फुटबॉलचा ‘जादुगार’ सुनील छेत्री होणार निवृत्त!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : भारतासारख्‍या क्रिकेटप्रेमी देशाला फुटबॉलमध्‍येही आपली वेगळी ओळख निर्माण करुन देणारा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार असणारा छेत्री हा कुवेतविरुद्ध फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होणार आहे. त्‍याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक भावूक व्‍हिडिओ पोस्ट करत आपल्‍या निवृत्तीची घोषणा केली. ३९ वर्षीय सुनील छेत्रीने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे.
भारताचा स्‍टार फुटबॉलपटू सुनील छेत्री

महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली
 कुवेतविरुद्धचा शेवटचा सामना खेळणार
20 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी 145 सामने खेळले, तर 93 गोल केले.

फूटबॉलमधील पदार्पणाचा दिवस कधीही विसरू शकत नाही
6 जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा सुनील छेत्रीने केली आहे. X वर पोस्ट केलेल्या सुमारे 9 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सुनील छेत्री भावूक दिसला. त्‍याने म्‍हटलं आहे की, आज मला माझ्‍या पदार्पणाच्या सामन्याची आठवण झाली. तसेच सुखी सरांची आठवण झाली, जे त्यांचे पहिले राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होते. या सामन्यातच पहिला गोल केला होता. जेव्हा त्याने राष्ट्रीय संघाची जर्सी घातली तेव्हा एक वेगळीच भावना होती. पदार्पणाचा दिवस तो कधीही विसरू शकत नाही.

I’d like to say something… pic.twitter.com/xwXbDi95WV
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 16, 2024

आई आणि पत्‍नीबरोबर मीही अश्रूला वाट करुन दिली…
६जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक २०२६ पात्रता फेरीतील सामना हा माझा शेवटचा सामना असेल. आता मला सर्व काही आठवू लागले आहे. ते खूप विचित्र होते. मी खेळाचा विचार करू लागलो, प्रशिक्षक, मी केलेला चांगला आणि वाईट खेळ, प्रत्‍येश मैदान.. सर्व काही. निवृत्तीबाबत मी माझ्या आई -वडील आणि पत्नीला सर्वप्रथम. माझ्‍या वडिलांनी सामान्‍य राहत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही; पण माझी आई आणि पत्‍नी भावूक झाल्‍या. त्‍यांच्‍यासह मीही अश्रूला वाट करुन दिली, असेही त्‍याने पोस्‍ट केलेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये म्‍हटलं आहे.
२० वर्षांची कारकीर्द, १४५ सामने ९३ गोल
छेत्रीने 20 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी 145 सामने खेळले असून 93 गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंच्या यादीत त्‍यांचा समावेश आहे.
हेही वाचा : 

Kolhapur Football : काेल्‍हापुरातील ‘नाद खुळा’ फुटबाॅल प्रेमी…गोलसाठी दिलं तब्बल तीन लाखांचं बक्षीस!
कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची भारतीय फुटबाॅल संघात निवड
Kylian Mbappe Transfer Update : अबब…फुटबाॅलपटू एम्बाप्पेने नाकारली तब्बल २७२५ कोटींची ऑफर! जाणून घ्या कारण…