टोपी, उपरणं, काठी अन् घोंगडं! नाशिककरांकडून मोदींना भेटवस्तू

टोपी, उपरणं, काठी अन् घोंगडं! नाशिककरांकडून मोदींना भेटवस्तू

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक जिल्ह्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाशिककरांकडून खास भेटवस्तू दिल्या गेल्या. स्थानिक शेतकऱ्यांचे प्रतीक म्हणून टोपी, उपरणं तसेच काठी अन‌् घोंगडं ही मोदींना भेट म्हणून दिले गेले. मोदींनीही या भेटवस्तू आनंदाने स्वीकारात टोपी घालूनच संपूर्ण भाषण केले.
पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा बुधवारी (दि.१५) पार पडली. मोदींचे हेलिकॉप्टर सभास्थळी लॅण्ड होताक्षणी सभेस उपस्थित जनसमुदायाने ‘मोदी, मोदी’चा जयघोष सुरू केला. मोदी व्यासपीठावर येताच उपस्थितांनी उभे राहत हात उंचावून अभिवादन केले. ‘मोदी, मोदी’, ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी सभास्थळ दुमदुमले. भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी मोदींना शेतकऱ्यांचे प्रतीक म्हणून गांधी टोपी, उपरणे परिधान केले. खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार यांच्या हस्ते रामलल्लाची मूर्ती देऊन मोदींचा सत्कार झाला. तर भूषण कासलीवाल यांनी नमोकार मंत्राची प्रतिकृती भेट दिली. सोहनलाल भंडारी, आ. दिलीप बनकर यांनी मोदींचे स्वागत केले. यानंतर मोदींनी संपूर्ण भाषण टोपी आणि उपरणं परिधान करून केले. मोदींनी ‘जय शिवाजी’ अशी घोषणा देत मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यामुळे उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
हेही वाचा:

महाराष्ट्र लुटणाऱ्या दोघा लुटारूंना हाकलून लावा: उद्धव ठाकरे यांचा मोदी, अमित शाहांवर घणाघात
Loksabha election | काकासाहेब – मंत्री, कुलगुरू अन संमेलनाध्यक्षही..
Peregrine Falcon : रॉकेटच्या वेगाने शिकार करणारा पक्षी