कोल्हापूर : स्क्रॅप व्यवसायातून साडेपाच कोटीची फसवणूक; दोघांवर गुन्हा

कोल्हापूर : स्क्रॅप व्यवसायातून साडेपाच कोटीची फसवणूक; दोघांवर गुन्हा

शिरोली एमआयडीसी; Bharat Live News Media वृत्तसेवा : स्क्रॅप व्यवसायिकाची साडेपाच कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी बुधवारी (दि.१५) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनायक सुकुमार लाड यांनी रचना अँग्रो सर्व्हिसेंस व पीपी ट्रेडर्स या कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विनायक सुकुमार लाड (वय २७ व्यवसाय स्क्रॅप , रा. पुलाची शिरोली) यांच्या वडिलांचा २४ वर्षापासून स्क्रॅप व्यवसाय आहे. त्यांची मटेरियल सीआय बोरिंग व एमएस स्क्रॅपची भावेश्र्वरी इंडस्ट्रिज नावाची फर्म आहे. डिसेंबर २०२३ मध्ये विनायक यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या फर्मचे कामकाज बंद अवस्थेत असून या फर्मकडून विविध कंपन्याना माल पुरविण्यात येत होता. त्यापैकी रचना अँग्रो सर्व्हिसेंस या फर्मचे प्रोप्रायटर कल्पेश बाळासो कुंभार (रा . घुडेवाडी आवळी खुर्द ता राधानगरी ता. कोल्हापूर ) व पीपी ट्रेडर्स या फर्मचे प्रोप्रायटर पांडुरंग मारुती कुंभार ( रा .दत्त मंदिर जवळ, घुगेवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ) यांची स्क्रॅप व्यवसायामधूनच विनायक याच्याबरोबर ओळख झालेली होती. सन २०२१ पासून विनायक यांनी स्क्रॅप ( रॉ मटेरियल सीआयबोरिंग व एमएस स्क्रॅप) चा कच्चा माल कल्पेश कुंभार यांना त्यांच्या मागणीप्रमाणे सन २०२१ ते २०२२ ला विनायक यांनी कुंभार यांना साधारण ५० ते ७० लाख रुपयांचा कच्चा माल दिला होता. त्याचे पैसे हे त्याने विनायक यांना रोखीने दिले. यादरम्यान विनायकचा कुंभार यांच्यावर विश्वास निर्माण झाला. त्यामुळे विनायक यानी कुंभार यांच्या मागणीप्रमाणे रचना अँग्रो सर्व्हिसेंस व पीपी ट्रेडर्स या फर्म शिरोली येथील ऑफीसमध्ये ट्रकद्वारे ५ कोटीचा कच्चा माल दिला. या मालाच्या रक्कमेसाठी वारंवार मागणी करूनही कल्पेश कुंभार यांनी ही रक्कम परत केली नाही. खोटी आश्वासने देवून विनायक यांची दिशाभूल केली. कुंभार यांनी वारंवार मागितल्यानंतर तुझे पैसे देत नाही काय करायचे ते कर, अशी धमकी देत विनायक यांची साडेपाच कोटीची फसवणूक केली.