छत्रपती संभाजीनगर : भावाला ‘मिस यू ऑल’चा मॅसेज करून तरुणाने जीवनयात्रा संपवली

छत्रपती संभाजीनगर : भावाला ‘मिस यू ऑल’चा मॅसेज करून तरुणाने जीवनयात्रा संपवली

वाळूज महानगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : लहान भावाला आय लव्ह यू ब्रो, अँड मिस यू ऑल, असा मॅसेज पाठवून २५ वर्षीय तरूणाने आपली जीवनयात्रा संपवली. मराठा आरक्षण मिळत नाही व डोक्यावर बँकेच्या कर्जाचा बोजा असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना वडगाव कोल्हाटी येथे बुधवारी (दि.१५) सकाळी उघडकीस आली. दत्ता कालीदास महिपाल पाटील ( वय २५ रा.शिंदेवाडी, जि.बीड, ह.मु. साजापूर रोड,वडगाव) असे या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दत्ता हा वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत असून तो वडगाव येथील विलास शेजवळ यांच्या भाड्याच्या घरात राहत होता. आपली जीवनयात्रा संपवण्यापूर्वी त्याने जालना येथे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या लहान भाऊ महेश याच्या व्हाट्सअँपवर सुसाईट नोट पाठविली. त्यामध्ये त्याने लिहले होते की, आय लव्ह यू ब्रो, अँड मिस यू ऑल, मी काही कारणावरुन स्वतःचे जीवन संपवत आहे. गोपाल अर्बन माजलगाव या बॅकेकडून मी १ लाख रुपये कर्ज घेतले होते. पण काही कारणास्तव काही हप्ते मी भरले नाहीत. रोज फोन येत होते, मला खूप त्रास झाला. विजय माल्या, निरव मोदी यांच्यासारखे मोठे बिझनेसवाले कर्ज घेऊन पळून जातात. मात्र त्यांना कोणी काही बोलत नाही. पण शेतकऱ्यांना मात्र बोलून घ्यावे लागते. तसेच उपोषण करूनही मराठा आरक्षणाबाबत उपोषण करूनही काही फायदा झाला नाही. स्वाॅरी मम्मी-पप्पा सुखी रहा, तुमचा दत्ता…  अशी त्याने सुसाईट नोट पाठवली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी भावाची सुसाईट नोट पाहिल्यानंतर घाबरलेल्या महेशने वाळूज महानगर परिसरात राहणाऱ्या अशोक सुरवसे या नातेवाईकांना संपर्क केला.  व दत्ताच्या रूमवर जाण्यास सांगितले. दरम्यान सुरवसे हे दत्ता रहात असलेल्या रुमवर गेले असता त्यांना दत्ता हा गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, ज्योती गात, पोलीस अंमलदार रोहित चिंधाळे, पंकज साळवे, राहुल रणवीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी रूग्णलयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :

चंदगड : टेम्पोच्या धडकेत तडशिनहाळच्या युवकाचा मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर
Nashik News | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत, अजंग ग्रामस्थांचा नामपूर मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको
Nashik News | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत, अजंग ग्रामस्थांचा नामपूर मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको