लोकसभा रणसंग्राम: जळगाव 2.35 तर रावेरमध्ये 2.80 टक्के मतदान वाढले

लोकसभा रणसंग्राम: जळगाव 2.35 तर रावेरमध्ये 2.80 टक्के मतदान वाढले

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने पहिल्या दिवसापासून कंबर कसलेली होती. यामध्ये पथनाट्य व्हिडिओ गाणी जनजागृती यावर भर देऊन जिल्ह्यात प्रथमच 60 टक्के मतदानाच्या टक्का पार केलेला आहे यात जळगाव लोकसभेत 2.35 टक्के वाढ झाली असून रावेर लोकसभेमध्ये 2.80 टक्के मतदान वाढले आहे.
लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीमध्ये जळगाव लोकसभेमध्ये 56.12 टक्के मतदान झालेले होते तर 2024 मध्ये हे मतदान 58..47 टक्के झाले. तर रावेर लोकसभेमध्ये 2019 च्या निवडणुकीत 61.40 टक्के मतदान झाले होते. सर 2024 च्या लोकसभेमध्ये 64.28 टक्के मतदान झालेले आहे.
जळगाव लोकसभेमध्ये 58..47 टक्के मतदान झालेले आहेत. यामध्ये पुरुष 60.55 टक्के महिला 56.22 टक्के व व तृतीयपंथी लोकांनी 21.18 टक्के मतदान केले आहेत . रावेर लोकसभेमध्ये एकूण पुरुष 621983 महिला 548950 तृतीय 11 मतदान झालेले आहेत. पुरुषांची 66.50 टक्के महिला 62.38 तर तृतीयपंथी 20.37 टक्के असे एकूण 64.28 टक्के मतदान झालेले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघ
जळगाव सिटी पुरुष 117429 महिला 97116 तृतीय 2
जळगाव ग्रामीण पुरुष 107907 महिला 95012 तृतीय 2
अंमळनेर पुरुष 89466 महिला 78853 तृतीय 1
एरंडोल पुरुष 95132 महिला 81945 तृतीय 2
चाळीसगाव पुरुष 115093 महिला 95950 तृतीय 8
पाचोरा पुरुष 103096 महिला 88951 तृतीय 3

असे मतदान झाले असून एकूण पुरुष 628123 महिला 537827 तृतीय 18 मतदान झालेले आहेत. पुरुषांची ६०.५५ टक्के, महिला 56.22 टक्के तर तृतीयपंथी 21.18 टक्के असे एकूण 58.47 टक्के मतदान झालेले आहे.

रावेर मतदार संघात 64.28 टक्के मतदान
चोपडा. पुरुष 105497 महिला 95338 तृतीय 1
रावेर पुरुष 111919 महिला 100233 तृतीय 0
भुसावळ पुरुष 92283 महिला 80076 तृतीय 9
जामनेर पुरुष 108756 महिला 95867 तृतीय 0
मुक्ताईनगर पुरुष 101100 महिला 90690 तृतीय 0
मलकापूर पुरुष 102428 महिला 86746 तृतीय 1 असे मतदान झाले असून एकूण पुरुष 621983, महिला 548950, तृतीय 11 मतदान झालेले आहे. पुरुषांची 66.50 टक्के तर तृतीयपंथी 20.37 टक्के असे एकूण 64.28 टक्के मतदान झालेले आहे.