तिहार तुरुंगाला बॉम्बने उडवण्याची धमकी, अधिकाऱ्यांनी दिली माहिती

तिहार तुरुंगाला बॉम्बने उडवण्याची धमकी, अधिकाऱ्यांनी दिली माहिती

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्लीच्या तिहार तुरुंगाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या संदर्भातील माहिती तिहार तुरुंग प्रशासनाने दिल्ली पोलिसांना दिली आहे. दिल्लीतील हॉस्पिटल, शाळा, जयपूरमधील शाळा आणि दिल्ली एअरपोर्टनंतर आता दिल्लीतील तिहार तुरुंगाला नव्याने मेलद्वारे बॉम्बने (Threat to Tihar Jail) उडवण्याची धमकी मिळाली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
दिल्लीत बॉम्बच्या धमक्या मिळण्याचा सिलसिला थांबत नाही. आता दिल्लीच्या तिहार तुरुंग प्रशासनाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने तुरुंग प्रशासन आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी दिल्लीतील अनेक रुग्णालयांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. दरम्यान आज (दि.१४) दुपारी धमकी मिळताच तिहार तुरुंग प्रशासनाने दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली आहे.
कारागृह प्रशासनालाही ईमेलद्वारे धमकी (Threat to Tihar Jail) देण्यात आली आहे. माहिती मिळाल्यानंतर कारागृहाचा तपास करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कारागृह प्रशासनाने केलेल्या तपासणीनंतर काहीही संशयास्पद आढळले नाही, असेही पोलिसांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

Delhi’s Tihar Jail recieved bomb threat call. The administration informed Delhi Police about the same. A mail was also recieved by the jail. An investyigation was initiated. Nothing has been found: Prision officals
— ANI (@ANI) May 14, 2024

यापूर्वी दिल्लीतील प्रतिष्ठित दीपचंद बंधू रुग्णालय, जीटीबी रुग्णालय, दादा देव रुग्णालय, हेडगेवार रुग्णालय यांनाही मंगळवारी ईमेल पाठवून बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. अशी धमकी मिळाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. रुग्णालयांमध्ये तपासणी केल्यानंतर तेथे काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलीस या ईमेलची चौकशी करत आहेत.
हे ही वाचा:

Delhi Bomb Threat : दिल्लीतील चार रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी
Jaipur bomb threat: दिल्लीनंतर जयपूरमधील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
Bomb Threat In Indian Museum : कोलकातामधील ‘इंडियन म्युझियम’मध्ये बॉम्ब धमकीचा ईमेल