सोलापूर: सर्व्हर डाऊनमुळे सात बारा ठप्प ! सोमवारपासून निघत नाहीत उतारे

सोलापूर: सर्व्हर डाऊनमुळे सात बारा ठप्प ! सोमवारपासून निघत नाहीत उतारे

गुळवंची, Bharat Live News Media वृत्तसेवा: सोलापूर जिल्ह्यासह राज्यात महाभूमिलेख सर्व्हरमधील बिघाडामुळे सोमवारपासून (दि.१३) ऑनलाइन सात-बारा उतारा देणे बंद आहे. सात-बारा उतारा मागणीसाठी (Solapur News) आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
शेतकऱ्यांना विविध संस्था व बँकाकडून घेतलेले कर्ज नूतनीकरण करावयाचे असल्यास शेतकऱ्यांना वारस नोंद, शेती वाटपाची नोंद, शेतकऱ्यांच्या विविध योजना, शेतीच्या मोजणीसाठी, शेती खरेदी विक्री करण्यासाठी डिजिटल सात बाराची गरज भासते. मात्र सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांचा (Solapur News) खेळखंडोबा झाला आहे.
सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांवर डिजिटल सात-बारा मिळत नसल्याने, सात-बारा मिळवण्यासाठी शेतकरी पूर्वीप्रमाणेच संबंधित गावच्या तलाठ्यांकडे धाव घेत आहेत. तलाठ्यांकडून लॅपटॉप द्वारे सात-बाराची प्रिंट उपलब्ध करून दिली जात होती. परंतु तलाठी यांना देखील उतारे डाउनलोड करण्यासाठी तांत्रिक अडचणी असल्याने उतारे निघत नसल्याने शेतकऱ्यांना उताऱ्याविनाच माघारी (Solapur News) परतावे लागत आहे.
शेतकरी विविध कामासाठी सात-बारा मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर गर्दी करतात. परंतु सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शेतकऱ्यांना सात बारा मिळण्यात अडचणी येत आहेत. सात-बारा डिजिटल झाला असला तरी, त्यासाठी मात्र शेतकऱ्यांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत.शेतकऱ्यांना उतारे मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा:

Solapur News: सोनंद येथे क्रुझरचा टायर फुटला; ३ शेतमजूर महिला जागीच ठार, ८ जखमी

Solapur News : सोलापूर मार्गावरील रेल्वेगाड्या चार ते पाच तासांनी उशिरा

Solapur Lok Sabha Election : सोलापूर लोकसभा मतदारसंघात 5.97 टक्के, माढ्यात 5.15 टक्के मतदान