परवानगी घेवूनच ‘भिडू’ म्‍हणायचं, नाहीतर २ कोटींचा दंड! जॅकी श्रॉफ यांची याचिका

परवानगी घेवूनच ‘भिडू’ म्‍हणायचं, नाहीतर २ कोटींचा दंड! जॅकी श्रॉफ यांची याचिका

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी परवानगीशिवाय त्यांचा आवाज, नाव आणि भिडू शब्द वापरण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भात त्‍यांनी दिल्‍ली उच्‍च न्यायालयासमोर विशेष अर्ज सादर केला आहे. विना परवानगी आपलं नाव, फोटो, आवाज आणि भिडू शब्द वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि 2 कोटी 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बॉलीवूडमध्‍ये जॅकी श्रॉफ यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्‍यांनी भिडू हा शब्‍द उच्‍चारणे चाहत्‍यांसाठी पर्वणी ठरते. त्‍यांच्‍या अभिनयाचीही ती ओळख आहे. परवानगीशिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाचा वापर होत असल्याबद्दल जॅकीने नाराजी व्यक्त केली आहे. याविरोधात त्‍यांनी आज ( १४ मे) दिल्ली उच्च न्यायालयात  याचिका दाखल केली आहे.

Actor Jackie Shroff moves Delhi High Court seeking protection of his personality and publicity rights. The suit has been filed against various entities using his name, photographs, voice and word “Bhidu” without his consent.
(file pic) pic.twitter.com/BQpn38yV7v
— ANI (@ANI) May 14, 2024

काय आहे जॅकी श्रॉफ यांची मागणी?
आपलं नाव, निवड आणि भिडू शब्दाच्या वापराबाबत अधिकार हवे आहेत, असे जॅकी श्रॉफ यांनी आपल्‍या याचिकेत नमूद केले आहे. विना परवानगी आपलं नाव, फोटो, आवाज आणि भिडू शब्द वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि 2 कोटी 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणीह त्‍यांनी याचिकेतून केली आहे. उच्च न्यायालयाने सध्या सर्व आरोपींविरुद्ध समन्स जारी केले आहेत आणि एमईआयटीवाय (तंत्रज्ञान विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय) यांना अशा सर्व लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. अभिनेत्याच्या वैयक्तिक अधिकारांचे अनधिकृतपणे उल्लंघन केले जात आहे . या प्रकरणी बुधवार १५ मेला न्‍यायालयात सुनावणी होणार आहे.
काय म्‍हणाले जॅकी श्रॉफ यांचे वकील?
जॅकीचे वकील प्रवीण आनंद यांनी न्यायालयाला सांगितले की, जॅकी श्रॉफ यांची प्रतिमा डागाळली जात आहे. अश्लील मीम्समध्ये त्यांच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. याशिवाय त्याच्या आवाजाचाही गैरवापर होत आहे. त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन थांबविण्यात यावे. अभिनेत्याची जॅकी श्रॉफ, जॅकी, जग्गू दादा आणि भिडू अशी वेगवेगळी नावे कोणत्याही व्यासपीठावर वापरण्यास बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.
‘या’ कालाकारांनीही प्रसिद्धी हक्कांसाठी घेतली होती न्‍यायालयात धाव
प्रसिद्धी हक्कांसाठी न्यायालयाकडे मदत मागण्याची बॉलीवूडमधील अभिनेत्‍याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लोक अभिनेत्याची कॉपी करणे आणि त्याच्या संमतीशिवाय त्याचा आवाज वापरण्यापासून रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मागील वर्षी अनिल कपूर यांनीही आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी ‘झाकस’ शब्द असलेल्या बोलण्‍याची लकब, , त्याचे नाव, आवाज, बोलण्याची पद्धत, प्रतिमा, उपमा आणि देहबोली यांच्या संरक्षणाची मागणी केली होती. न्‍यायालयाने अमिताभ बच्‍चन आणि अनिल कपूर यांच्‍या याचिकांवर सुनावणी घेत दोघांनाही त्‍यांच्‍या प्रसिद्धी हक्कांसाठी कायद्‍याचे संरक्षण दिले होते.
हेही वाचा : 

Ayesha Shroff Cheating Case | अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नीची फसवणूक; गुन्हा दाखल
Ram Mandir-Jackie Shroff : ‘भक्ती में ही शक्ती है..’ अयोध्येहून जॅकीने अनवाणी आणली रामलल्लाची मूर्ती (video)
आणि अनिल कपूरला जॅकी श्रॉफने १७ वेळा लगावली होती थोबाडीत!