घाऊक महागाई दर एप्रिलमध्ये १३ महिन्यांच्या उच्चांकावर

घाऊक महागाई दर एप्रिलमध्ये १३ महिन्यांच्या उच्चांकावर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारताच्या घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर एप्रिलमध्ये वाढून १.२६ टक्क्यांवर गेला. जो मार्चमध्ये अल्प प्रमाणात वाढून ०.५३ टक्के होता. एकूणच एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर १३ महिन्यांच्या उच्चांकावर राहिला. याबाबतची आकडेवारी वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी जारी केली आहे. फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा दर ०.२० टक्के होता. तो एप्रिलमध्ये वाढला आहे.
कांद्याचा घाऊक दर एप्रिलमध्ये ५९.७५ टक्क्यांनी वाढला. मार्चमध्ये तो ५६.९९ टक्क्यांनी वाढला होता. त्यासोबत एप्रिलमध्ये बटाट्याचा घाऊक महागाई ७१.९७ टक्क्यांनी वाढला. जो मार्चमध्ये ५२.९६ टक्क्यांनी वाढला होता. मार्चमध्ये ४.७ टक्क्यांनी वाढल्यानंतर घाऊक अन्नधान्य महागाईचा दर वार्षिक आधारावर ५.५२ टक्क्यांवर पोहोचला.

The annual rate of inflation based on all India Wholesale Price Index (WPI) number is 1.26 % (Provisional) for the month of April, 2024 (over April, 2023): Ministry of Commerce & Industry pic.twitter.com/uMKrVfkeH3
— ANI (@ANI) May 14, 2024