घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : मृतांची संख्या १४ वर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : मृतांची संख्या १४ वर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : प्रचंड वादळी पाऊस आणि धुळीचे वादळ अकस्मात धडकल्याने सोमवारी संध्याकाळी मुंबई, ठाणे परिसराची धुळधाण उडाली. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर भले मोठे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ४३ जणांवर उपचार सुरू आहेत.

धुळीच्या वादळाचा मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसराला तडाखा बसला आहे.
घाटकोपरमधील महाकाय होर्डिंग अनधिकृत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
अनधिकृत होर्डिंग परवानगीची मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

घाटकोपरमध्ये घटनास्थळी एनडीआरएफच्या दोन पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफचे निखिल मुधोळकर यांनी सांगितले की, “आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८८ लोकांना वाचवण्यात आले आहे. ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

#WATCH | Mumbai’s Ghatkopar hoarding collapse incident: NDRF assistant commandant Nikhil Mudholkar says, “A total of 88 people were rescued, of whom 14 were declared dead by doctors and 31 were discharged… The problem is that we are unable to use our gasoline-based cutting… https://t.co/vk4pYTgneL pic.twitter.com/Uf5g1FvB7e
— ANI (@ANI) May 14, 2024

घाटकोपरचे दुर्घटनाग्रस्त होर्डिंग अनधिकृत
घाटकोपर येथे कोसळलेले महाकाय होर्डिंग अनधिकृत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या होर्डिंगला लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाची परवानगी होती. परंतु पालिकेचे नियम धाब्यावर बसवून १४ हजार ४०० चौरस फुट आकाराचे महाकाय होर्डिंग उभारण्यात आले. दरम्यान, या होर्डिंगचा मालक भावेश भिडे व अन्य आरोपींवर पंतनगर पोलिसात महापालिकेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रात्री उशीरा सांगण्यात आले. या दुर्घटनेनंतर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने मुख्यालयातील आपत्कालीन कक्ष जाऊन दुर्घटनेची माहिती घेतली.
होर्डिंग उभारताना आजूबाजूच्या झाडांवर विष प्रयोग
घाटकोपर येथे पालिकेचे नियम धाब्यावर बसवून रेल्वे वसाहत येथे महाकाय होर्डिंग उभारण्यात आले होते. ७ डिसेंबर २०२१ मध्ये होर्डिंग उभारण्यास रेल्वे लोहमार्ग आयुक्तांनी परवानगी दिली. पालिकेच्या होर्डिंग धोरणामध्ये ४० बाय ४० म्हणजे १ हजार ६०० चौरस फूट पर्यंत होर्डिंग उभारण्यास परवानगी आहे. परंतु युको मीडिया कंपनीने १२० बाय १२० म्हणजेच १४,४०० चौरस फूट होर्डिंग उभारले. विशेष म्हणजे हे होर्डिंग उभारताना आजूबाजूच्या झाडांवर विष प्रयोग करण्यात आला होता. तर काही झाडे तोडण्यात आली. यावेळी पालिकेने कंपनीला नोटीसही बजावली होती. एवढंच नाही तर धोरणानुसार वोटिंगचं आकारमानही मोठे असल्यामुळे नोटीस बजावून हे काम थांबवण्यात आले होते. मात्र तरीही कंपनीने एप्रिल २०२२ पासून होल्डिंग उभारण्याचे काम सुरू केले.
हेही वाचा : 

यंदा मान्सूनचे आगमन लवकर, हवामान विभागाने सांगितली तारीख
मुंबई-गोवा महामार्गावर कारची कंटेनरला धडक; ४ जण जखमी
यंदाच्या पावसाळ्यात कोकण किनारपट्टीवर 22 ‘हायटाईड’