अवकाळीचा फटका! ठाणे- बेलापूर रोड वरील वाहतुकीत मोठा बदल

अवकाळीचा फटका! ठाणे- बेलापूर रोड वरील वाहतुकीत मोठा बदल

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबई शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे बेलापूर रोडवरील सविता केमिकलजवळ वादळामुळे इलेक्ट्रिक पोल रस्त्यावर पडला. त्यामुळे अवजड वाहतुकिसाठी मार्गात बदल करण्यात आला. पनवेल आणि बेलापूर या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व हालक्या आणि अवजड वाहन चालकांनी वाहने पावणे सिग्नल वरून डाव्या बाजूने व्हाईट हाऊसमार्गे शालिमार चौक ते हापे एमआयडीसी रोड या मार्गाचा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, तसेच ठाणे बेलापूर मार्गावरील हलक्या वाहनांनी पावणे गाव ब्रिजवरून बेलापूरला जाण्याकरिता मार्गाचा वापर करावा, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
या सोबतच नवी मुंबईत सोमवारी (दि.13) झालेल्या सायंकाळी 04. 05 ते 5. 35 या वेळेत झालेल्या अवकाळी पाऊस झाला. या वेळेत बेलापूर, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या भागात सरासरी 13.83 मिलीमीटर पाऊस झाला.
मुंबई भागात पावसाची टक्केवारी

बेलापूर – 03.4 मि. मी
नेरूळ – 04.0 मि. मी
वाशी – 12.6 मि. मी
कोपरखैरणे – 17.4 मि. मी
घणसोली – 12.4 मि. मी
ऐरोली – 33.2 मि. मी

या झालेल्या मुसळधार पावसात नवी मुंबईत एकुण 36 झाडे कोसळली

ऐरोली – 12
सीबीडी- 3
नेरुळ- 5
वाशी-7
कोपरखैराने -9

हेही वाचा :

घाटकोपर दुर्घटनेत ४७ नागरिकांना बाहेर काढण्यात यश : उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबईला वादळी वा-याचा तडाखा, होर्डिंगसह पार्किंग लिफ्ट कोसळून मोठा अपघात
Lok Sabha Election 2024 : तिहार तुरुंगात असलेले मनिष सिसोदिया ‘आप’चे स्टार प्रचारक, स्वाती मालिवाल यांना वगळले