कल्याण डोंबिवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, आंबा पिकाला फटका

कल्याण डोंबिवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, आंबा पिकाला फटका

कल्याण – Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याण डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण सह आसपासच्या परिसरातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे सुरूवात केली. कल्याण डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी सहा झाडे पडल्याची घटना घडली असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. टिटवाळा, रायते या कल्याण ग्रामीण परिसरात अवकाळी पावसामुळे आंब्याला फटका बसल्याने आंबा उत्पादकामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कल्याण-डोंबिवली शहरासह कल्याण ग्रामीण परिसरात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार सोसट्याच्या वाऱ्यासह धुळीचे लोट उठू लागले आणि थोड्या वेळानंतर रिमझिम पावसाला सुरूवात झाली होती. सुसाट्याच्या वाऱ्याच्या वाढत्या गतीबरोबर पावसाने जोर धरल्याने कल्याण डोंबिवलीकर सुखावले होते.
हवामान विभागाने कोकण विभागात १३ ते १५ मे या तीन दिवसासाठी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कल्याण बिर्ला कॉलेज राष्ट्रीय महामार्ग परिसरात, चिकणघर दत्त मंदिर परिसरातील झाड, मानेरे गाव, टिटवाळा पूर्व आदी चार ठिकाणी तर डोंबिवलीतील पी अँड टी कॉलनी व नांदिवली पोस्ट ऑफिस जवळ अशी दोन झाडे अशी एकूण कल्याण डोंबिवलीत सहा ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित धाव घेत रस्त्यावर डलेली झाडे त्वरित हटवून रस्ता वाहतुकीला मोकळा केल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून मिळाली आहे. अवकाळी पावसामुळे फेरीवाल्यांना आपला माल सुरक्षित ठिकाणी हालविण्यासाठी मोठी तारबंळ उडल्याचे दिसत होते. या अवकाळी पावसामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्तेचे नियोजन बिघडल्याचे दिसत होते. तर काही ठिकाणी विघुत पुरवठा खंडित झाला होता.