कोल्हापूर: सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

कोल्हापूर: सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

कुरुंदवाड : Bharat Live News Media वृत्तसेवा: हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे एका कर्जदाराला सावकारांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार ताजा असतानाच शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथील भालचंद्र कल्लाप्पा तकडे (वय ४४) या शेतकऱ्याने शेतातील गोठ्याच्या शेडमध्ये गळफास  लावून घेऊन जीवन संपविले. ही घटना आज (दि.१३) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. भालचंद्र यांच्या  खिशातून पोलिसांना एक चिट्ठी मिळाली आहे. त्यामध्ये ५ सावकारांची नावे असून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. सावकारांच्‍या जाचाला  कंटाळून जीवन संपवत असल्याचे या चिट्ठीत नमूद करण्‍यात आले आहे.
शेतकऱ्याने टोकाचे पाऊल का उचलले?

शेडशाळ येथील भालचंद्र कल्लाप्पा तकडे यांनी जीवन संपविले, त्‍यांच्‍यावर  ५९ लाख रुपये कर्ज होते,
खिशातून पोलिसांना एक चिट्ठी मिळाली.
५  सावकारांनी त्‍यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती
कर्जाला कंटाळून जीवन संपवत असल्याचा त्‍यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

सात गावात खळबळ
भालचंद्र तकडे यांनी ५ सावकरांकडून ५९ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, अशी चर्चा घटनास्थळी होती. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भालचंद्र हा आपल्या शेतातील गोट्याच्या पत्राच्या अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन जीवन संपविल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळाचा पोलीस नाईक राजेंद्र सानप यांनी  पंचनामा केला. भालचंद्र यांच्या खिशात आढळलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.  मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेगुलंद ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. सावकारीला कंटाळून तकडे यांनी जीवन संपविल्याचे वार्ता पसरताच नदीपलीकडील सात गावात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :

कोल्हापूर: यड्राव येथे भीषण अपघातात महिला ठार; १० जण जखमी 
कोल्हापूर जिल्ह्याला तीन दिवस ‘यलो अलर्ट’
कोल्हापूर : राधानगरीच्या वाकीघोल परिसरात हत्तीचे आगमन; नागरिकांत घबराहट