खुनातील संशयित क्रांतीनगरमधून ताब्यात, पंचवटी पोलिसांची कारवाई

खुनातील संशयित क्रांतीनगरमधून ताब्यात, पंचवटी पोलिसांची कारवाई

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- मुंबईनाका येथील सहवास नगर परिसरात १९ एप्रिल रोजी झालेल्या युवकाच्या खूनप्रकरणात फरार असलेल्या संशयितास पंचवटी पोलिसांनी क्रांतीनगर भागातून पकडले आहे. समर्थ दत्तात्रय तायवाडे (२२, रा. क्रांतीनगर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.
सहवासनगर येथे टोळक्याने पियुष भीमाशंकर जाधव (२०) याचा मागील वादाची कुरापत काढून खून केला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात १२ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. संशयित फरार झाले होते. पंचवटीचे सहायक निरीक्षक विलास पडोळकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी क्रांतीनगर परिसरात सापळा रचला. रविवारी (दि.१२) रात्री आठच्या सुमारास संशयित समर्थ येताच त्याला पोलिसांनी पकडले. त्याचा ताबा मुंबईनाका पोलिसांना दिला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक संपत जाधव, हवालदार सागर कुलकर्णी, दीपक नाईक आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
हेही वाचा –

Congress: केंद्रात सरकार आल्यास ‘मराठी’ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार, काँग्रेसची मोठी घोषणा
Stock Market Closing Bell | बाजारात जोरदार रिकव्हरी, गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का, नेमकं काय घडलं?
Jalgaon Lok Sabha | गळ्यात कापसाची व मक्याची माळ घालून मतदान, अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून निषेध